Join us  

SHAME: नेहा कक्करवर भर कार्यक्रमात जबरदस्ती! गाता गाता स्टेजवरच कोसळले रडू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2017 6:11 AM

गायिका नेहा कक्करला एका अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. ‘कर गयी चुल्ल’ आणि ‘काला चष्मा’ फेम नेहावर एका ...

गायिका नेहा कक्करला एका अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. ‘कर गयी चुल्ल’ आणि ‘काला चष्मा’ फेम नेहावर एका लग्नाच्या कार्यक्रमात तब्येत बरी नसतानाही गाण्यासाठी बळजबरी करण्यात आली. अत्यंत अपमानास्पद आणि असंवेदनशील वागणूकीमुळे तिला स्टेजवरच रडू कोसळले.नेहा चित्रपटात पार्श्वगायन करण्याबरोबरच लाईव्ह शो आणि लग्न-कार्यातही गाण्याचे कार्यक्रम करते. ती लग्नाच्या दिवशी नाही तर त्याआधी होणाऱ्या संगीत/मेहंदीच्या कार्यक्रमात गाते. यावेळी मात्र ती जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचली तेव्हा तिला कळाले की, आज प्री-वेडिंग कार्यक्रम नसून प्रमुख लग्न सोहळाच आहे.आयोजकांनी तिची फसवणूक केली होती. तसेच तिची तब्येतही यावेळी बरी नव्हती. केवळ शब्द दिला होता म्हणून ती या कार्यक्रमात आली होती. लग्नात न गाण्याच्या तिच्या अटीविरुद्ध तिने परफॉर्म करण्यास होकार दिला. पण लग्नात जमलेल्या प्रचंड गर्दीच्या डिमांड्स आणि वर्तणूकीमुळे तिने जेव्हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला आयोजकांनी थांबवून गायन चालू ठेवण्यासाठी दबाव टाकला.काला चष्मा सिंगर : नेहा कक्कर या संपूर्ण घटनेबद्दल नेहाने तिच्या फेसबुक अकाउंटवर सविस्तर लिहिले आहे. तिची आपबिती वाचा तिच्याच शब्दात-आम्ही सेलिब्रेटी आहोत म्हणून लोक आम्हाला त्यांच्या हातातील खेळणे समजतात. नुकतेच मलाएका अत्यंत वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. मी लग्नात परफॉर्म करत नाही हे माहित असूनहीएका इव्हेंट कंपनीने माझी फसवणूक करून मला एका लग्नात गाण्यास भाग पाडले. कार्यक्रमाच्याठिकाणी पोहचल्यवर मला सत्य परिस्थिती कळाली. पण शब्द दिलेला असल्यामुळे तब्येत खराबअसतानाही मी सुमारे एक तास परफॉर्म केले. त्यानंतर मला गाणे शक्यच नव्हते म्हणून मी आयोजकांनी सांगितले की, माझी तब्येत ठीक नसूनमी आता आणखी जास्त नाही गाऊ शकत. पण त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, ‘आणखी परफॉर्मकेल्या शिवाय मी येथून जागची हलू शकत नाही.’ मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्रते माझ्यासोबत फोटो घेण्यात दंग होते. नाईलाजाने मी पुन्हा स्टेजवर गेले. माझ्यासोबत जे घडले त्यामुळे माज भर स्टेजवरच रडू कोसळले.मला अश्रू रोखने अनावर झाले. एका क्षणासाठी तर सेलिब्रेटी असल्याचा पश्चाताप झाला. आज मीजे कही आहे केवळ तुमच्यासारख्या चाहत्यांमुळे आहे, पण मला तुम्ही सांगा की, जेव्हा माझी तब्येतठीक नसेल तेव्हा तरी न गाण्याचा अधिकार माझा आहे ना?