शाहरुख-रजनीची टक्कर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST
शाहरुख खान आणि सूपरस्टार रजनीकांत या दोघांमध्ये पुढच्या वर्षी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. शाहरुखचा 'फॅन' आणि रजनीकांतचा 'काबली' ...
शाहरुख-रजनीची टक्कर?
शाहरुख खान आणि सूपरस्टार रजनीकांत या दोघांमध्ये पुढच्या वर्षी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. शाहरुखचा 'फॅन' आणि रजनीकांतचा 'काबली' दोन्ही चित्रपट १४ एप्रिलला रिलिज होणार असे सांगण्यात येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी 'काबली'ची शूटिंग सुरु झाली असून जानेवारी महिन्यात ती पूर्ण होईल. १४ एप्रिल रोजी तमिळ नववर्ष सुरु होत आहे. या मुहूर्तावर 'काबली' प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. यामध्ये रजनीकांत एका गँगस्टरच्या रुपात दिसणार आहे. नुकतेच त्याचे पहिले पोस्टर लाँच झाले. यशराज फिल्म्सच्या 'फॅन'ची रिलिज डेट आगोदर जाहिर करण्यात आली होती. मनीष शर्मा दिग्दर्शित 'फॅन'मध्ये शाहरुख स्वत:च्याच फॅनचा रोल करत आहे. शाहरुख आणि रजनीकांत दोघे फार चांगले मित्र आहेत. 'रा.वन'मध्ये रजनीने छोटीशी भूमिका केली होती तर शाहरुखने 'लूंगी डान्स' गाण्यातून त्याचे आभार मानले होते.