शाहरुख खानचे खरमरीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:14 IST
एका टुथपेस्टची जाहीरात टीव्हीवर कायम झळकत असते. या जाहिरातीत आतापर्यंत अनेक हिरोईन्सनी काम केले आहे. यात हिरोईन सामान्य माणसाला ...
शाहरुख खानचे खरमरीत उत्तर
एका टुथपेस्टची जाहीरात टीव्हीवर कायम झळकत असते. या जाहिरातीत आतापर्यंत अनेक हिरोईन्सनी काम केले आहे. यात हिरोईन सामान्य माणसाला प्रश्न करते 'काय तुमच्या टुथपेस्ट मध्ये मीठ आहे?' आता शाहरूख खानला त्याच्या एका चाहतीने देखील हाच प्रश्न विचारला. यावर शाहरूखने तिला चांगलेच खरमरीत उत्तर दिले. शाहरूख म्हणाला 'माझ्या टुथपेस्ट मध्ये मीठ आहे की नाही मला माहित नाही. पण तुझ्या कोणत्यातरी गोष्टीत मात्र जरूर मिरची असली पाहिजे.' बिचारी चाहती आता यापुढे कोणालाही प्रश्न विचारताना दहा वेळा तरी नक्की विचार करेल!