Join us  

तुम्हा दोघांमुळे माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले...; शाहरूख खानने लिहिली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 1:50 PM

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर व आदित्य चोप्राची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. शाहरूखने करण व आदित्यासोबत अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत.

ठळक मुद्दे  शाहरूख ‘सत्ते पे सत्ता’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर व आदित्य चोप्राची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. शाहरूखने करण व आदित्यासोबत अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडे शाहरूखने करण व आदित्यसोबत काम करण्याचा स्वत:चा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला. एक भावूक पोस्ट लिहित त्याने करण व आदित्यचे आभार मानलेत.

‘स्वप्न चांगली असतात. पण त्या स्वप्नांना दिशा मिळाली नाही तर ती स्वप्न निरर्थक ठरतात. या दोघांनी माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले. तुमच्या स्वप्नांपेक्षा, तुमची स्वप्नं पूर्ण करणारी माणसं अधिक महत्त्वाची आणि गरजेची असतात,’असे शाहरूखने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

गत दोन दशकात शाहरूखने करण व आदित्यसोबत मिळून अनेक रोमॅन्टिक हिट चित्रपट दिलेत. दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, कुछ कुछ होता है,  माय नेम इज खान, कभी खुशी कभी गम, अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटातील शाहरूखच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. करण,आदित्य आणि आदित्यचे वडील यश चोप्रा  यांच्या चित्रपटांमुळे शाहरूख ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

यापूर्वी शाहरूख आनंद एल राय यांच्या ‘झीरो’ या चित्रपटात दिसला होता. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. तेव्हापासून शाहरूखने एकही चित्रपट साईन केलेला नाही.   शाहरूख ‘सत्ते पे सत्ता’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. फराह खान हा चित्रपट दिग्दर्शित करणार, असेही सांगितले जात आहे. अर्थात अद्याप शाहरूख वा फराह खानने याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही.

टॅग्स :शाहरुख खानकरण जोहरआदित्य चोप्रा