Join us  

'झिरो'ला घेऊन शाहरुख खान करतोय 'हा' विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 7:56 AM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'झिरो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ह्या चित्रपटात शाहरुख खानबरोबर कतरिना कैफ आणि ...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'झिरो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ह्या चित्रपटात शाहरुख खानबरोबर कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे. शाहरुख खान ह्या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांपेक्षा जास्त उत्सुक दिसतोय.  शाहरुख पहिल्यांदाच या चित्रपटाबाबत मीडियाशी बोलला त्याने सांगितले की, या चित्रपटाच्या सेटवर त्याला कसे वाटते. शाहरुख खानने ट्विटरवर लिहिले आहे की, चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना एकदम लहान मुलगा होऊन जातो. शाहरुखने पुढे 'झिरो' चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. सलमान खानही शाहरुखच्या प्रेमापोटी या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. ALSO READ :  ‘डॉन-३’मधून प्रियांका चोप्राचा पत्ता कट; शाहरुख खानने शोधली नवी ‘जंगली बिल्ली’!या वर्षाच्या सुरुवातील आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून शाहरुख खान 'झिरो' एक झलक प्रदर्शित केली होती. शाहरुखचा हा चित्रपट सारा अली खानच्या केदारनाथ बरोबर प्रदर्शित होणार आहे म्हणजेच बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर बघायला मिळणार आहेत हे दोन्ही चित्रपट  नाताळ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपटांच्या क्लैशस डेटला घेऊन 'केदारनाथ' दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रेरणा अरोरा यांच्या वाद सुद्धा झाल्याचे समजते. अभिषेक कपूरला ठरलेल्या तारखेला चित्रपट रिलीज करायचा आहे तर प्रेरणाला किंग खानसोबत बॉक्स ऑफिसवर कोणताच पंगा घ्यायचा नाही आहे. त्यामुळे तिने हा चित्रपट 'झिरो'च्या आधी रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय.