Join us

शाहरूख खानने शेअर केला आपल्या लाडक्या अबरामचा आणखी एक फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 14:26 IST

अभिनेता शाहरूख खान त्याच्या लाडक्या अबरामचे फोटोज् नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असतो. अबरामचा असाच एक सुंदरसा फोटो शाहरुखने ...

अभिनेता शाहरूख खान त्याच्या लाडक्या अबरामचे फोटोज् नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असतो. अबरामचा असाच एक सुंदरसा फोटो शाहरुखने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘मोस्ट हॅण्डसम मोमेंट’ असे टायटल दिले आहेत. सध्या हा फोटो नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय असून, मोठ्या प्रमाणात त्याला लाइक्स मिळत आहेत. वास्तविक शाहरूखचे मोठा मुलगा अन् मुलगी सुहाना यांच्यासोबत चांगले ट्यूनिंग आहे. त्याचबरोबर अबराम हा त्याच्या सर्वाधिक क्लोज आहे. त्यामुळे तो नेहमीच त्याचे फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असतो. यावेळेस शेअर केलल्या फोटोमध्ये चिमुकल्या अबरामचा हात दिसत आहे. त्या हातावर लाल रंगाचे हार्टचे निशाण दिसत आहे. या फोटोमधून एकच बाब स्पष्ट होते ती म्हणजे अबराम शाहरूखच्या किती क्लोज आहे. 

अबराम आता चार वर्षांचा झाला असून, त्याने शाळेत जाण्यास सुरुवात केली आहे. शाहरूखनेच याविषयीची काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती. वास्तविक एका चॅटदरम्यान शाहरूखच्या फॅन्सने त्याला विचारले होते की, मॉर्निंग वॉकला जात असताना मी तुझी कार बघितली होती. तेव्हा शाहरूखने खुलासा केला होता की, मुलगा अबरामला शाळेत सोडण्यासाठी गेलो होतो. त्यावरून अबराम शाळेत जात असल्याची माहिती समोर आली. वास्तविक अबराम मम्मीपेक्षा पप्पा शाहरूखच्या खूप क्लोज आहे. त्यामुळेच तो नेहमीच शाहरूखसोबत बघावयास मिळतो. बºयाचदा तर शाहरूख त्याला शूटिंग आणि प्रमोशनसाठीही सोबत घेऊन जाताना बघावयास मिळाला आहे. शाहरूखलाही अबरामसोबत अधिकाधिक वेळ रहायला आवडत असल्यानेच तो त्याला शक्य होईल तेव्हा सोबत घेऊन जात असतो.