Join us

​आंतरराष्ट्रीय फॉर्मटवर तयार होणाºया शोचे संचालन करणार शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 20:50 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. टीव्हीवर देखील त्याने काही मालिका व क्विझ शोचे संचालक ...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. टीव्हीवर देखील त्याने काही मालिका व क्विझ शोचे संचालक केले आहे. आता पुन्हा एकदा तो एकदा टीव्ही शोचे संचालन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हा शो आंतरराष्ट्रीय फॉर्मटवर तयार करण्यात येणार असल्यचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात या शो टीव्हीवर लाँच करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केल्या जाणाºया शो प्रमाणे याची निर्मिती केली जाणार आहे. सध्या या शोचे नाव फायनल केलेले नाही. मात्र हा शो भारतात प्रसारित केल्या जाणाºया शोच्या तुलनेत उजवा ठरणार आहे. यात स्पेशल ग्राफिक्स किंवा सेट व संवादाची पद्धत ही आकर्षक असेल. शाहरुख खान याने आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्ही शोच्या माध्यमातून केली असल्याने त्याला या माध्यमाबाबत विशेष प्रेम आहे. शाहरुखने ‘कौन बनेगा करोडपती’ व ‘क्या आप पाचवी पास से तेज है’ या सारखे टीव्ही शो होस्ट केले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधील त्याचे संचालन चाहत्यांना आवडले होते. शाहरुख खान सध्या आगामी रईस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील गाणे डिजीटल प्लेटफार्मवर हिट ठरली आहेत. ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इम्तियाज अली दिग्दर्शित करीत असलेल्या रहनुमा या चित्रपटात तो अनुष्का शर्माच्या अपोझिट दिसणार आहे. हा चित्रपट आॅगस्ट महिन्यात रिलीज होणार असल्याची घोषणा सलमान खान याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केली होती यासोबतच या चित्रपटाला नाव देण्याचे आवाहनही त्याने केले होते.