Join us  

Pathaan Housefull Show: काश्मीरमध्ये 'पठाण'ची धूम; खोऱ्यात तब्बल ३२ वर्षांनी 'हाऊसफुल्ल' झाला सिनेमा हॉल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 7:39 AM

Pathaan Movie In Kashmir Valley: बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Pathaan Movie In Kashmir Valley: बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील शाहरुख खानच्या जबरदस्त अॅक्शन सीन्सने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. देशभरात रिलीज झालेला 'पठाण' सिनेमा दररोज अनेक नवे विक्रम रचत आहे. 'पठाण'ने काश्मीरमध्ये असा चमत्कार घडवला आहे की खोऱ्यात तब्बल ३२ वर्षांनी सिनेमागृहाबाहेर 'हाऊसफुल'ची पाटी लागली आहे. 

देशातील प्रसिद्ध मल्टीप्लेक्स चेन INOX Leisure Ltd ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याच शाहरुख खानने यावर प्रतिक्रिया देताना सर्वांचे आभार मानले आहेत. INOX ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. "संपूर्ण देशात 'पठाण'ची क्रेझ आहे. ३२ वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यात हाऊसफुलची पाटी लागल्याबद्दल आम्ही किंग खानचे आभारी आहोत. धन्यवाद शाहरुख खान", असं ट्विट INOX नं केलं आहे. 

'पठाण'ने नोंदवला विक्रमशाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. 'पठाण' पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासह 'पठाण' हा पहिलाच चित्रपट आहे जो वीकेंडच्या आधी प्रदर्शित झाला आहे. याशिवाय या चित्रपटाने भारतातील सर्वाधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याचा विक्रमही केला आहे. रिलीजपूर्वी 'बेशरम रंग' या गाण्याबाबत विरोध झाला असला तरी ४ वर्षांनंतर 'किंग खान'चे पुनरागमन झाल्यानं चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. याआधी शाहरुख खान २०१८ मध्ये 'झिरो' सिनेमामध्ये दिसला होता.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खान