Join us  

पुन्हा एकत्र झळकणार सुपरस्टार्स शाहरुख खान- सलमान खान,'दबंग 3'मध्ये होणार सुपर धमाका !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:59 PM

'दबंग 3' मध्ये चुलबुल पांडेचा भूतकाळ दाखवला जाणार आहे. शाहरूख चुलबुल पांडेची मदत करताना पाहायला मिळणार आहे.

सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'दबंग 3' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. प्रभुदेवा या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून 2019मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाविषयी आणखीन एक माहिती समोर येत आहे. दबंग 3 मध्ये सलमानचा खास मित्र शाहरूख सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाच शाहरूखची भूमिकाही इतर भूमिकाप्रमाणे महत्त्वाची असेल. त्यामुळे  पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर सलमान शाहरुख येणार आमने सामने....  बॉलीवुडचा बादशहा आणि दबंग खान यांना एकत्र रूपेरी पडद्यावर एकत्र पाहणे रंजक ठरणार हे मात्र नक्की. इतकेच नाही तर यात पुन्हा एकदा सलमान खान व सोनाक्षी सिन्हा ही जोडी पाहायला मिळणार आहे.

शाहरूखची सलमानच्या सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हर दिल जो प्यार करेगा सिनेमातही ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती.  सलमानच्या 'ट्यूबलाइट' सिनेमात शाहरूख झळकला होता. तर शाहरुख खान 'झिरो' सिनेमातही सलमान खानवर एक खास गाणे चित्रीत करण्यात आले होते. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांचाही आनंद द्विगुणित होतो. शाहरूखने ही ब-याच सिनेमात पाहुण्या कालाकाराची भूमिका निभावली आहे. 'हर दिल जो प्यार करेगा', 'साथिया', 'लक बाय चान्स', 'शक्ती-द पॉवर', ' हे बेबी' सिनेमात शाहरूख विशेष भूमिकेत झळकला होता.

'दबंग 3' मध्ये चुलबुल पांडेचा भूतकाळ दाखवला जाणार आहे. शाहरूख चुलबुल पांडेची मदत करताना पाहायला मिळणार आहे.  खुद्द सलमानेच शाहरूखला दंबग 3चा हिस्सा बनण्यासाठी विचारणा केली होती. यावर शाहरूखही सलमानला नकार कसा देणार, त्यानेही क्षणाचा विलंब न करता सलमानला होकार दिला होता.

टॅग्स :सलमान खानशाहरुख खान