Join us

शाहरूखने दिले कॅटरिनाला प्रॉमिस!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 21:54 IST

शाहरूख खान लवकरच इम्तियाज अलीच्या चित्रपटात दिसणार आहे. इम्तियाजच्या या चित्रपटात अनुष्का शर्माची वर्णी लागणार अशी खबर होती. पण ...

शाहरूख खान लवकरच इम्तियाज अलीच्या चित्रपटात दिसणार आहे. इम्तियाजच्या या चित्रपटात अनुष्का शर्माची वर्णी लागणार अशी खबर होती. पण खुद्द शाहरूखने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनुष्का या चित्रपटाचा भाग नसणार हे शाहरूखने स्पष्ट केल्यानंतर आता या चित्रपटात एसआरकेच्या अपोझिट कोण दिसणार, याबाबत उत्सूकता आहेच.  अलीकडे कॅटरिना लेटनाईट शाहरूखच्या बंगल्यावर पोहोचल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. आनंद एल राज याच्या आगामी चित्रपटाबद्दल शाहरूखशी चर्चा करायला कॅट ‘मन्नत’वर गेली होती, असेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. हे खरेही आहे. पण ‘मन्नत’वर कॅटरिना व एसआरके यांच्यात केवळ एवढीच चर्चा झाली नाही तर आणखीही बरीच चर्चा झाली. शाहरूखने म्हणे यावेळी कॅटरिनाला एक चित्रपट देण्याचे प्रॉमिस दिले. आता हा चित्रपट कुठला असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. आता शाहरूखने प्रॉमिस पाळलेच तर कॅट व त्याचा रोमान्स पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळू शकतो..तेव्हा वेट अ‍ॅण्ड वॉच...