Join us  

‘कोल्ड वॉर’ विसरून शाहरूखने दाखवला मनाचा मोठेपणा, सनी देओलला दिले या ब्लॉकबस्टर सिनेमाचे राईट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:20 PM

लेकासाठी सनीने सुुरू केली रिमेकची तयारी...

ठळक मुद्देसनी देओल त्याचा मुलगा करण देओलसाठी ‘दामिनी’चा रिमेक बनवतो आहे

बॉलिवूड स्टार सनी देओल आता आपल्या  ‘दामिनी’ या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या रिमेकच्या तयारीला लागला आहे. ‘दामिनी’ हा तसा महिलाप्रधान सिनेमा. पण या चित्रपटात सर्वांवर भारी पडला तो सनी. पुढे तर हा सनीचा सिनेमा म्हणूनच ओळखला गेला. ‘दामिनी’ सुपरडुपर हिट झाला. चित्रपटातील संवाद तर आजही लोक विसरू शकलेले नाहीत. ‘न्यायासाठी अख्ख्या समाजाविरोधात लढणा-या महिलेची ही कथा व हा सिनेमा बॉलिवूडच्या बेस्ट वूमन सेंट्रिक चित्रपटात गणल्या जातो.

‘दामिनी’त ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्री यांनी भूमिका केल्या. पण या चित्रपटामुळे खरी लोकप्रियता मिळाली ती सनी देओल याला. त्याचा या चित्रपटातील तारीख पे तारीख... हा डायलॉग तर इतका गाजला की, ‘दामिनी’ हा सनी देओलचाच सिनेमा ठरला.आता सनी याच सिनेमाचा रिमेक बनवतोय. पण स्वत:साठी नाही तर आपल्या मुलासाठी. विशेष म्हणजे, यासाठी शाहरूख खान सनीच्या मदतीला तयार झाला आहे.

आता ‘दामिनी’चा आणि शाहरूखचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे. ‘दामिनी’चे अधिकार शाहरूखच्या रेड चिली एंटरटेनमेंटकडे आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरूखने फिल्म मेकर्सकडून ते खरेदी केले होते. सनी देओल ‘दामिनी’चा रिमेक बनवू इच्छितो, ही बातमी ऐकल्यावर किंगखान म्हणे स्वत: सनीच्या घरी गेला आणि ‘दामिनी’चे राईट्स त्याच्या सुपूर्द केले.

सनी देओल त्याचा मुलगा करण देओलसाठी ‘दामिनी’चा रिमेक बनवतो आहे. करण देओलने अलीकडे ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा डेब्यू सिनेमा बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. लेकाचा पहिला सिनेमा फ्लॉप झाल्यावर सनी पुन्हा कामाला लागला.

टॅग्स :सनी देओलशाहरुख खान