Join us  

...अखेर शाहरूख खान मुलांना का करतोय मिस?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 3:38 PM

मित्रांनो... शाहरूख खानने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहिले की, लॉस एंजलिसची सैर झाली आहे. आता मुलांना मिस ...

मित्रांनो... शाहरूख खानने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहिले की, लॉस एंजलिसची सैर झाली आहे. आता मुलांना मिस करणार आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’च्या नव्या गाण्यासाठी परत यावे लागेल, ‘हवाइयां!’ आता शाहरूखच्या या ट्विटमध्ये दोन अर्थ निघतात. एक तर शाहरूख त्याच्या मुलांना मिस करीत आहे. दुसरे म्हणजे शाहरूख आतापर्यंत त्याच्या परिवाराबरोबर सुट्या एन्जॉय करीत होता. मात्र मध्येच त्याला ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या गाण्यासाठी मुंबईकडे रवाना व्हावे लागले आहे. होय, ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे नवे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. याबाबतची सूचना खुद्द शाहरूखनेच त्याच्या ट्विटमध्ये दिली आहे. गाण्याचे बोल ‘हवाइयां’ असे आहेत. या नव्या गाण्याविषयीची अधिक माहिती गाणे रिलीज झाल्यानंतरच होईल. मात्र एक गोष्ट निश्चित की, हे नवे गाणेदेखील इतर गाण्यांप्रमाणेच सुपरहिट असेल. आतापर्यंत या चित्रपटातील ‘राधा, बीच बीच, बटरफ्लाई, सफर’ आदी गाणी लॉन्च करण्यात आली आहेत. त्यामुळे या नव्या गाण्याविषयी शाहरूखच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आणि इम्तियाज अली द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट ४ आॅगस्ट रोजी रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात शाहरूख पंजाबी मुलाची तर अनुष्का शर्मा गुजराती मुलीची भूमिका साकारणारा आहेत. शाहरूख गाइडच्या भूमिकेत असेल जो युरोपमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अनुष्काला गाइड करतो. मात्र दोघेही भिन्न विचारांचे असल्यामुळे त्यांच्यात सारखे मतभेद होतात. पुढे त्यांच्यात लव्हस्टोरी बहरते.