Join us  

शाहरुख खानला पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले मानधन ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 6:14 PM

शाहरुख खानला दिल आशना है या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली. १९९२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी शाहरुख खानला केवळ काही हजार रुपये मानधन मिळाले होते.

ठळक मुद्दे१९९२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी शाहरुख खानला केवळ ५० हजार रुपये इतकेच मानधन मिळाले होते. चमत्कार या चित्रपटासाठी शाहरुखला ७५ हजार रुपये मिळाले होते तर कभी हाँ कभी ना या चित्रपटासाठी त्याला केवळ २५ हजार आणि राजू बन गया जेंटलमनसाठी ५० हजार रुपये मिळाले होते.१९९३ ला आलेल्या बाजीगर या चित्रपटात त्याने लाखोमध्ये मानधन घेतले. या चित्रपटासाठी त्याला तब्बल ११ लाख रुपये मिळाले होते.

अभिनेता शाहरुख खानने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याच्या फौजी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. यामुळेच त्याला हेमा मालिनी यांनी दिल आशना है या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्याला दिवाना या चित्रपटाची ऑफर आली. त्याने दिल आशना है या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी दिवाना हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला असल्याने दिवाना त्याचा पहिला चित्रपट ठरला. दिल आशना है या चित्रपटासाठी शाहरुख खानला किती मानधन मिळाले होते हे तुम्हाला कळले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

शाहरुख खानला दिल आशना है या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली. १९९२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी शाहरुख खानला केवळ ५० हजार रुपये इतकेच मानधन मिळाले होते. शाहरुख खानचा दिवाना हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्यानंतरच्या दिल है आशना या चित्रपटाला देखील समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. शाहरुखने या चित्रपटांच्या यशांनंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटांनंतर तो चमत्कार या चित्रपटात झळकला. नसिरुद्दीन शहा, शम्मी कपूर, उर्मिला मार्तोंडकर यांच्या या चित्रपटात शाहरुखसोबत महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटासाठी शाहरुखला ७५ हजार रुपये मिळाले होते तर कभी हाँ कभी ना या चित्रपटासाठी त्याला केवळ २५ हजार आणि राजू बन गया जेंटलमनसाठी ५० हजार रुपये मिळाले होते. शाहरुखला त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांसाठी केवळ काही हजार मिळाले असले तरी १९९३ ला आलेल्या बाजीगर या चित्रपटात त्याने लाखोमध्ये मानधन घेतले. या चित्रपटासाठी त्याला तब्बल ११ लाख रुपये मिळाले होते. १९९५ ला प्रदर्शित झालेल्या गुड्डू या चित्रपटापर्यंत शाहरुख ३५-४० लाख इतके मानधन घ्यायला लागला होता. आता तर प्रेक्षकांचा लाडका शाहरुख करोडोमध्ये मानधन घेतो. सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या बॉलिवूडच्या अभिनेत्यांमध्ये आज त्याची गणना होते. 

टॅग्स :शाहरुख खान