Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या नव्या 'डंकी' सिनेमाची घोषणा, जाणून घ्या कधी होणार रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:48 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून डंकी सिनेमाची घोषणा केली आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुखचा डंकी  (Dunki) सिनेमा 2023मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी (RajKumar Hirani) यांनी केलं आहे. 

शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून डंकी सिनेमाची घोषणा केली आहे. शाहरुखने या सिनेमा संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. डंकीच्या माध्यमातून  बॉलिवूडमध्ये हे दोघे मोठे दिग्गज सोबत काम करत आहेत. शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानीसोबत काम करणार आहे. शाहरुखचे चाहते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. या एप्रिलपासून हा चित्रपट फ्लोरवर गेला आहे. सिनेमाचे बरेचसे शूटिंग पंजाबमध्ये होणार आहे. 

शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शाहरुखने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे," ''राज कुमार हिरानी या पिढीतील उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे".  डंकी 22 डिसेंबर 2023ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :शाहरुख खानराजकुमार हिरानी