बाळासाठी शाहीदची पुर्वतयारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:09 IST
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे दोघेही आता बाळाचे गोड स्वप्न पाहू लागले आहेत. त्याच्यासाठी काय करू आणि ...
बाळासाठी शाहीदची पुर्वतयारी...
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे दोघेही आता बाळाचे गोड स्वप्न पाहू लागले आहेत. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले आहे. शाहीद तर म्हणतोय,‘ मी तर तयारी पण सुरू केली आहे. मला कळालेय की, पॅरेंटिंगचे काही अॅप्स असतात. त्यात सांगण्यात येते की, कोणत्या वेळेस बाळाची कशी काळजी घ्यायला हवी.मी तेच फॉलो करणार आहे. त्याशिवाय त्याला काही हवे असेल तर ते त्याची आई पाहील. पण आता आम्ही दोघेही आता त्याची आतुरतेने वाट पाहतो आहोत. मी त्याच्यासाठी फार काही करायचा विचार करून ठेवला आहे. मी स्वत:मध्येही त्याच्यानुसार बदल करतो आहे.’ वेल, शाहीद तु तर फारच उत्सुक आहेस. आणि का असणार नाहीस? लवकरच तुमचे बाळ तुमच्या हातात असेल...तुझ्या तयारीसाठी तुला बेस्ट आॅफ लक!