शाहिद म्हणाला,‘त्या दोघी फँटास्टिक!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:03 IST
बॉलिवूडमधील कलाकार आपल्या सहकलाकारांचे कधीच कौतुक करत नाहीत. उलट, चुका, टिकाटिप्पणीच करत राहतात. मात्र, शाहिद कपूर याला अपवादच म्हणावा ...
शाहिद म्हणाला,‘त्या दोघी फँटास्टिक!’
बॉलिवूडमधील कलाकार आपल्या सहकलाकारांचे कधीच कौतुक करत नाहीत. उलट, चुका, टिकाटिप्पणीच करत राहतात. मात्र, शाहिद कपूर याला अपवादच म्हणावा लागेल. त्याने बॉलिवूडच्या सध्याच्या प्रमुख अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले. शाहिदने ‘उडता पंजाब’ मध्ये आलियासोबत काम केले आहे तर ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘हीर रांझा’ मध्ये दीपिका पादुकोण हिच्यासोबत त्याने काम केले आहे. दोघींसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला,‘बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत खुप अभिनेत्रींनी आपला वेगळेपणा अभिनयातून सिद्ध केला. नर्गिसजी, मधुबाला, माधुरी दिक्षीत, काजोल यांच्या भूमिकांना तर मी ‘हॅट्स आॅफ’ करतो. पण, सध्याच्या प्रमुख अभिनेत्रींपैकी दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या मला मेहनती आणि उत्तम अभिनय करणाºया वाटतात. त्यांच्यासोबत काम करणं मी एन्जॉय करतो.’ नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना शाहिदने त्याची मुलगी मिशाला जर अभिनेत्री व्हायची अशी इच्छा व्यक्त केल्यावर मी तिला काय उत्तर देईन? अशी भीती व्यक्त केली. लवकरच शाहिद कपूर विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात सैफ अली खान आणि कंगणा राणौत यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.