Join us  

'या' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसेल शाहिदची बहीण सना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:17 AM

आता ती दिग्दर्शक अभिषेक सक्सेना यांच्या 'सरोज का रिश्ता' या सिनेमात सरोजची भूमिका साकारणार आहे. 

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांची मुलगी सना कपूर आपल्या नव्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून सना पहिला सिनेमा करत आहे. याआधी शाहिद कपूरच्या 'शानदार' मध्ये ती दिसली होती. आता ती दिग्दर्शक अभिषेक सक्सेना यांच्या 'सरोज का रिश्ता' या सिनेमात सरोजची भूमिका साकारणार आहे. 

सना या सिनेमाबाबत म्हणाली की, 'हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं की, एक माणूस म्हणून तुम्ही फार युनिक आहात. सर्वांना एकाच बॉक्समध्ये फिट करू नये. जर तुम्हाला स्वत:ला बदलायचं असेल तर तुमच्या मर्जीने बदला. याच कारणाने मला हा विषय आवडला'.

पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारण्याचं दडपण आहे का? यावर ती म्हणाली की, 'मी सध्या सिनेमाच्या जबाबदारीबाबत काही विचार करत नाहीये. तो विचार मी प्रमोशनवेळी करेन. सध्या मी 'सरोज' आहे आणि ही भूमिका मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. मला आशा आहे की, लोकांना ही भूमिका पसंत येईल'. 

या भूमिकेसाठी मोठा भाऊ शाहिद याने काही मार्गदर्शन केलं का? यावर ती म्हणाली की, 'भावाने सांगितलं की, जे करतीये ते एन्जॉय कर. मी तेच करत आहे.'  

टॅग्स :बॉलिवूडशाहिद कपूर