Join us

‘रंगून’ च्या शूटिंगवेळी शाहिद कपूरची जमली ‘बोमी’सोबत गट्टी!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 18:58 IST

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा चित्रपट नेहमीच अत्यंत वेगळे कथानक, गाणी, प्लॉट यांवर आधारित असतो. ‘रंगून’ हा चित्रपटही त्यातलाच. शाहिद ...

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा चित्रपट नेहमीच अत्यंत वेगळे कथानक, गाणी, प्लॉट यांवर आधारित असतो. ‘रंगून’ हा चित्रपटही त्यातलाच. शाहिद कपूर, कंगना राणौत, सैफ अली खान हे एकदम हटके त्रिकूट या निमित्तानं त्यांनी एकत्र आणलं. चित्रपटातील त्यांची बाँण्डिंग पाहता कुणालाही असं वाटणार नाही की, हे तिघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘रंगून’च्या टीमसोबतच आणखी एक व्यक्ती चर्चेत आला तो म्हणजे बोमी. ALSO READ : ‘मेरे मियाँ गये इंग्लंड’ गाण्यातील कंगना राणौतचा फनी अंदाज पाहून तुम्ही पडाल प्रेमात!आता हा बोमी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शाहिद जेव्हा अरूणाचल प्रदेशातील ‘पासिघाट’ येथे चित्रपटाची शूटिंग करत होता तेव्हा त्याच्यासोबत ‘बोमी’ नावाचा एक सैनिक त्याची काळजी घेण्यासाठी देण्यात आला होता. शूटिंगदरम्यान, या दोघांमध्ये अतिशय चांगली मैत्री जमून आली. ते दोघे ‘रोहतंग पास’ या ठिकाणापर्यंत अनेकदा एकत्र जात होते. तर शूटिंगदरम्यान अनेक दिवस ते एकमेकांसोबत राहत होते. एक सैनिक म्हणून त्याच्यासमोर कोणती आव्हाने आहेत, त्याचं आयुष्य कसं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता शाहिदला लागली होती. बोमी शूटिंग एन्जॉय करतोय हे पाहून शाहिदला प्रचंड आनंद झाला. सुत्रांनुसार कळतेय की, शाहिदने त्याला एक लेदरचे जॅकेट आणि बूटांचा एक जोड गिफ्ट म्हणून दिला. ALSO READ : ‘रंगून’ म्हणजे म्युझिकल ट्रीट! -सुखविंदर सिंगदुसऱ्या जागतिक महायुद्धावेळीचे वातावरण विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात चित्रीत करण्यात आले आहे. कंगना राणौत आणि सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत असून शाहिदची भूमिकाच यात मध्यवर्ती असल्याचे दिसतेय. चित्रपटातील आत्तापर्यंत रिलीज झालेली गाणी ही अतिशय श्रवणीय असून शाहिद आणि कंगना यांच्या बोल्ड अंदाजाची चर्चा सध्या सुरू आहे.