शाहिद कपूरला बॉलिवूडमध्ये १४ वर्षे पूर्ण; असे मानले चाहत्यांचे आभार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 13:28 IST
‘जब वी मेट’,‘कमीने’,‘हैदर’, ‘उडता पंजाब’ सारख्या काही चित्रपटांतील सर्वोत्तम अभिनयासोबत शाहिद कपूरने बॉलिवूडमध्ये आपली १४ वर्षे पूर्ण केली आहेत. ...
शाहिद कपूरला बॉलिवूडमध्ये १४ वर्षे पूर्ण; असे मानले चाहत्यांचे आभार!
‘जब वी मेट’,‘कमीने’,‘हैदर’, ‘उडता पंजाब’ सारख्या काही चित्रपटांतील सर्वोत्तम अभिनयासोबत शाहिद कपूरने बॉलिवूडमध्ये आपली १४ वर्षे पूर्ण केली आहेत. आपला हा आनंद शाहिदने आज चाहत्यांसोबत शेअर केला. शाहिदला बॉलिवूडमध्ये १४ वर्षे पूर्ण झालीत. पण आजही मी स्वत:ला विद्यार्थीच समजतो. अद्यापही मला बरेच काही शिकायचे आहे, असे त्याने म्हटले आहे. निश्चितपणे हा शाहीदचा मोठेपणा आहे. यशस्वी वाटचाल करताना यशाची हवा त्याच्या डोक्यात गेलेली नाही, हेच त्याच्या शब्दांतून दिसतेय.आपल्या करिअरच्या १४ व्या ‘वाढदिवशी’ शाहिदने चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा व प्रेमासाठी धन्यवाद. १४ वर्षे मी फिल्म इंडस्ट्रीत जे मला भावले तेच केले. एक विद्यार्थी म्हणूनच मी वावरतो. या इंडस्ट्रीकडून मी खूप काही शिकलो आहे. अद्यापही बराच मोठा पल्ला गाठायचाय. शिकायचे खूप आहे आणि वेळ कमी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार, असे त्याने म्हटले आहे. }}}} }}}}ALSO READ : मीशाचा डॅडी शाहिद कपूरबरोबरचा डान्स तुम्ही बघितला काय?सन २००३ मध्ये आलेल्या ‘इश्क-विश्क’ या चित्रपटाद्वारे शाहिदने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर बॉलिवूडचा रोमॅन्टिक आणि चॉकलेटी हिरो अशीच शाहिदची ओळख झाली. अभिनेता बनण्याआधी अनेक चित्रपटात डान्सर म्हणून दिसला होता. तूर्तास शाहिद संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहिद राणी पद्मावतीचा पती रावल रत्न सिंह याची भूमिका साकारणार आहे. त्याच्याशिवाय दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. एकंदर काय तर शाहिदची यशस्वी घोडदौड सुरु आहे. ही घोडदौड अशीच सुरु राहो, अशा शुभेच्छा देऊ यात!!