शाहरूख- रोहितच्या मैत्रीत का पडली फूट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:15 IST
‘दिलवाले’ बॉक्सआॅफिसवर आपटल्यानंतर जणू शाहरूख खान व दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. सूत्रांच्या मते, शाहरूख व ...
शाहरूख- रोहितच्या मैत्रीत का पडली फूट?
‘दिलवाले’ बॉक्सआॅफिसवर आपटल्यानंतर जणू शाहरूख खान व दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. सूत्रांच्या मते, शाहरूख व रोहितची मैत्री आता आधीसारखी राहिलेली नाही. अर्थात ही बाब रोहितने अनेकदा फेटाळून लावली आहे. शाहरूख व माझ्यात काहीही बिनसलेले नाही, असेच तो ब-याच इव्हेंटमध्ये सांगत आला. मात्र अलीकडे एका इव्हेंटमध्ये रोहितने या अप्रत्यक्षपणे या वृत्ताला दुजोराच दिला. होय, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुझा सच्चा मित्र कोण? असा प्रश्न रोहितला विचारला गेला. यावर रोहितने अजय देवगण, संजय दत्त व सुनील शेट्टीचे नाव घेतले. पण शाहरूखचे नाव घेणे त्याने टाळले. आज रोहित ज्याचे नाव घेणे टाळतोय, त्याच शाहरूखला ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या वेळी रोहितने मोठा भाऊ संबोधले होते. यावरून स्पष्ट होते की, शाहरूख व रोहितमध्ये फारसे काही आॅलवेल नाही. याच शोमध्ये रोहितने ‘दिलवाले’बद्दल आणखी एक गोष्ट सांगितली. ‘दिलवाले’ ही खरे तर तीन भावांची कथा होती. काजोलची भूमिका केवळ फ्लॅश बॅकपुरती होती. पण शाहरूख व काजोलची जोडी बघता, चित्रपटाची स्क्रीप्ट बदलण्यात आली आणि नेमका हा बदल प्रेक्षकांना रूचला नाही. रोहितच्या मते, ओरिजनल स्क्रीप्ट खूप मजेदार होती आणि प्रेक्षकांना ती खूप आवडली असती. आता यामागची रोहितची नाराजी बरीच बोलकी आहे, हे सांगायला नकोच.