बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. सुहानाने नुकतेच इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
सुहाना खानने इंस्टाग्राम स्टोरीवर तिची कजिन आलिया छिब्बासोबत जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुहानाने हिरव्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस परिधान केला आहे. तर आलियाने नियॉन कलरचा ब्रालेटवर निटेड टॉप आणि ब्लॅक पँट्स घातली आहे. हा फोटो शेअर करून सुहानाने लिहिले की, ती आलियाला खूप मिस करते आहे. सुहाना खानने शेअर केलेल्या फोटोत तिचे डोके अर्धे डोके कट झाले आहे आणि तिने लिहिले की, माझा डोक कट झाले आहे मी खूप जास्त उंच आहे.