Join us  

शाहरुखच्या मुलीचा फोटो पुन्हा झाला व्हायरल, तर नेटीझन्सने यावेळी दिल्या अशा प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:30 AM

सुहाना शिकतेय आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय बॉलिवूड करिअर नाही, हे तिच्या डॅडने तिला कधीच सांगितले आहे.

सुहाना खानचे फोटो, तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात. क्षणात व्हायरल होतात. सध्या सुहानाचा एक नवा फोटो असाच व्हायरल होतोय. या फोटोत सुहाना नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेय. आपल्या स्टायलिश लुकने सुहाना खान नेहमीच सा-यांच मन जिंकते. अशातच सुहाना खानचा एक जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या फोटोमध्ये सुहाना खानचा लुक खूप जबरदस्त पण तितकाच गोड वाटत आहे. फोटोमध्ये सुहानाने स्कायब्लू ड्रेस आणि ब्लू डेनिम घातलेली आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त मजेदार तिची पोज आहे. हा फोटो खूपच मजेदार आहे. सुहानाच्या ओठांवर गोड हसू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होतेय. ती कधी डेब्यू करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण तूर्तास सुहाना शिकतेय आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय बॉलिवूड करिअर नाही, हे तिच्या डॅडने तिला कधीच सांगितले आहे.

नुकतेच सुहानाने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. शाहरूख आणि गौरीने लेकीच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुहानाने लंडनच्या Ardingly Collegeमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.  तिला कॉलेज कडून तिला विशेष पुरस्कारही देण्यात आला. सुहाना कॉलेजमधील ड्रामा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असे आणि तिच्या या योगदानसाठी तिला कॉलेज कडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुहानाच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीवेळी शाहरुख आणि गौरी खान दोघेही हजर होते. साहजिकच सुहानाला ग्रॅज्युएट झालेले पाहून शाहरूख व गौरीचा ऊर अभिमानाने भरून आला.शाहरुख खानने   गौरी आणि सुहानासोबत फोटो त्याच्या इन्स्टाग्राम शेअर केला. ‘शेवटचा पिज्झा... शेवटचा ट्रेनचा प्रवास... खºया आयुष्यात पहिले पाऊल... कॉलेज संपले अर्थात शिक्षण नाही’, असे कॅप्शन शाहरुखने या फोटोला दिले.  गौरी खान हिनेही सोशल मीडियावर सुहानाचा एक फोटो शेअर करत, माझी मुलगी सुहाना आता ग्रॅज्यूएट झाली. कॉलेजकडून तिला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असे लिहिले आहे.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान