Join us  

शाहरुख खान म्हणतो, ही जोडी जमायची नाय...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:52 PM

किंगखान शाहरुख खान आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार या दोघांची जोडी पडद्यावर कधीच दिसली नाही.  या जोडीला एकत्र पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत. पण ...

ठळक मुद्देशाहरुखचा अलीकडे प्रदर्शित झालेला ‘झिरो’ हा चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर किंगखान राकेश शर्माच्या बायोपिकमध्ये काम करणार, अशी बातमी मध्यंतरी होती.

किंगखान शाहरुख खान आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार या दोघांची जोडी पडद्यावर कधीच दिसली नाही.  या जोडीला एकत्र पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत. पण ही जोडी कधीच एकत्र आली नाही आणि कदाचित भविष्यातही ती एकत्र येणे नाही.  अक्षय व तू कधीच एकत्र काम का केले नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने जे काही सांगितले, ते ऐकून तरी हेच वाटतेय.

अक्षय व तू कधीच एकत्र काम का केले नाही? असा प्रश्न ताज्या मुलाखतीत शाहरुखला विचारण्यात आला. यावर त्याने बरेच मजेशीर उत्तर दिले. अक्षयसोबत मी कधीच का काम केले नाही, या प्रश्नावर मी काय बोलू? याचे कारण एकच आहे. ते म्हणजे, मी त्याच्यासारखा पहाटे उठू शकत नाही. त्याच्या दिवसाची सुरुवात होते, तेव्हा मी झोपायला जातो. तो पॅकअ‍ॅप करतो, त्यावेळी माझे काम सुरु होते. अनेक लोक माझ्यासारखे रात्री काम करत नाहीत, हे मला ठाऊक आहे. कदाचित त्यामुळेच माझ्यापेक्षा अक्षय कामाला अधिक वेळ देऊ शकतो. मला अक्षयसोबत काम करायला आवडेल. पण समजा मी असा एखादा चित्रपट साईन केलाच तर तो सेटवरून निघण्याच्या तयारीत असेल आणि येण्याच्या, असाच एक सीन आमच्यावर शूट होऊ शकतो. आमचे टायमिंगचं असे आहे,असे शाहरुख म्हणाला.

शाहरुखचा अलीकडे प्रदर्शित झालेला ‘झिरो’ हा चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर किंगखान राकेश शर्माच्या बायोपिकमध्ये काम करणार, अशी बातमी मध्यंतरी होती. पण यानंतर लगेच ‘डॉन 3’साठी शाहरूखने या बायोपिकला नकार दिल्याची बातमी आली. 

टॅग्स :शाहरुख खानअक्षय कुमार