Join us

सुहाना खानने ट्रोलिंगच्या भीतीने डिलीट केले लेटेस्ट फोटो?, कमेंट् सेक्शनवरही लावली मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 14:10 IST

Suhana khan deletes her latest instagram post : सुहानाने शेअर केल्यानंतर हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट केले आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावरील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. तिची सोशल मीडियावरील लोकप्रियता  बॉलिवूडमधील कोणत्याही सेलिब्रेटीपेक्षा कमी  नाही. रविवारी तिने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले होते जे चाहत्यांना खूप आवडले होते पण आता सुहानाने हे फोटो डिलीट केले आहेत.

सुहानाने पोस्ट केलेले फोटो  न्यूयॉर्कमधील एका सुंदर रेस्टॉरंटमधील होती. ब्लॅक कलरचा डीपनेक असलेला ड्रेस आणि परफेक्ट मेकअपसोबत सुहाना  दिसली होती. त्यात तिने गळ्यात घातलेल्या पेंडंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होते. 

सुहानाने शेअर केल्यानंतर हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट केले आहेत. यासह, तिने यूजर्सचा कमेंट सेक्शनसुद्धा बंद केला आहे. कदाच्त ट्रोलिंगमुळे सुहानाने हे फोटो डिलीट केले असावेत. गेल्या वर्षीही सुहानाने सोशल मीडिया मेसेजेचे अनेक स्क्रीनशॉट शेअर केले होते आणि ज्यात यूजर्सनी तिला रंगावरुन तिची खिल्ली उडवली होती. 

सुहानाने त्यावेळी लिहिले होते. माझ्या दिसण्यावर अनेक कमेंट्स केल्या गेल्यात. 12 वर्षांची असताना तुला रंग सावळा आहे म्हणून तू कुरूप दिसतेस, असे मला म्हटले गेले. विशेष म्हणजे, वयाने प्रौढ म्हटल्या जात असलेल्यांनी मला हे सांगितले. आता काय सांगणार? मुळात आपण सगळेच भारतीय कृष्णवर्णीय आहोत. आपल्या सर्वांचा रंग वेगवेगळा असतो. तुम्ही तुमचा रंग बदलू शकत नाही. सोशल मीडियावरील इंडियन मॅचमेकिंग पाहून किंवा तुम्ही 5 फूट 7 इंचीचे नाहीत, तुमचा रंग गोरा नाहीये म्हणून तुम्ही कुरूप आहात, हे कुटुंबाकडूनच तुमच्या मनावर बिंबवले गेले असेल तर याचा मला खेद आहे. पण माझी उंची 5 फूट 3 इंच आहे आणि माझा रंग सावळा आहे. पण तरीदेखील मी आनंदी आहे. माझ्यामते, मी जशी आहे त्यात आनंदी आहे आणि तुम्हालाही आनंदी राहता यायला हवे, असे सुहानाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते.   

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान