Join us  

DDLJ @25 काजोल- शाहरूखच्या सोशल मीडियावरील फोटोने वेधले लक्ष, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 1:34 PM

मराठा मंदिर थिएटरमध्ये दिलवाले दुल्हनिया मुक्काम ठोकून आहे आणि त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू  2५ वर्षा नंतरही कमी झालेली नाही. राज आणि सिमरन अर्थात किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या रोमँटिक जोडीने २५ वर्षापूर्वी निर्माण केलीली जादू आजही चित्रपट रसिकांच्या मनावर गारुड घालतेय.

हा सिनेमा इतका हिट झाला की, मराठा मंदिर थिएटरमध्ये दिलवाले दुल्हनिया मुक्काम ठोकून आहे... आणि त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. पहिल्या शो पासून हाउसफुल गर्दी खेचणाऱ्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाला पाहण्यासाठी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते थेट आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक प्रकारचा प्रेक्षक अजूनही मराठा मंदिर मध्ये आवर्जून उपस्थिती लावतो.  

हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने २५ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने काजोल आणि शाहरूखने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे प्रोफाईल फोटो बदलत दिलवाले दुल्हनियाँ सिनेमातले फोटो पोस्ट केले आहेत. पुन्हा दोघांना २५ वर्षापूर्वीचा काळ आठवला असून रसिकही सिनेमासोबत त्यांच्या आठवणींना ऊजाळा देत आहेत.

कुणी दिलं होतं हे टायटल? - 

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाचं टायटल अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी सुचवलेलं होतं. करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्या डोक्यात अशाप्रकारच्या टायटलचा अजिबात विचार नव्हता. किरणने शशी कपूरच्या 'ले जाएंगे ले जाएंगे' गाण्यातून हे टायटल काढलं होतं.

टॉवेल डान्ससाठी काजोलने दिला होता नकार

काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला सुरूवातीला 'मेरे ख्वाबो मे' गाणं शूट करण्यात खूप अडचण येत होती. तिला हे गाणं केवळ एका टॉवेलमध्ये शूट करण्याची आयडिया पसंत आली नव्हती. पण जेव्हा आदित्यने तिला समजावून सांगितले तेव्हा ती तयार झाली आणि शूटींग केली. गाणं सुपरहिट झालं. लोकांनी काजोलचं कौतुक केलं.

जेव्हा शाहरूखने काजोलला पाडलं... 

 'रूक जा ए दिल दिवाने' या गाण्यात एक सीन आहे ज्यात शाहरूख खान शेवटी काजोलला खाली पाडतो. असं करण्यासाठी त्याला आदित्यने सांगितलं होतं. जेणेकरून कॅमेरात काजोलचे खरेखुरे हावभाव शूट करता येतील. याबाबत काजोलला काहीच आयडिया नव्हती.

टॅग्स :शाहरुख खानकाजोल