Join us  

शबाना आझमी यांनी सांगितले जावेद अख्तर व उर्मिला मातोंडकरच्या ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:42 AM

गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. या व्हिडिओत जावेद अख्तर उर्मिला मातोंडकरसोबत डान्स करताना  रोमॅन्टिक झालेले दिसत आहेत.

ठळक मुद्देव्हिडिओत जावेद भवनान दादाच्या स्टेप्स करताना दिसत आहेत. नाही म्हणायला या व्हिडिओत जावेद यांच्या पत्नी शबाना आझमी,जावेद जाफरी हेही आहेत. पण सोशल मीडियावर तो व्हायरल झाला तो जावेद व उर्मिलाच्या डान्समुळे.

गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. या व्हिडिओत जावेद अख्तरउर्मिला मातोंडकरसोबत डान्स करताना  रोमॅन्टिक झालेले दिसत आहेत. पाठीमागे १९५१ मध्ये आलेल्या ‘अलबेला’ या चित्रपटाचे ‘शोला जो भडके’ गाणे वाजतेय आणि जावेद व उर्मिला धम्माल डान्स करत आहेत. हे गाणे भगवान दादावर चित्रीत करण्यात आले होते. व्हिडिओत जावेद भवनान दादाच्या स्टेप्स करताना दिसत आहेत. नाही म्हणायला या व्हिडिओत जावेद यांच्या पत्नी शबाना आझमी,जावेद जाफरी हेही आहेत. पण सोशल मीडियावर तो व्हायरल झाला तो जावेद व उर्मिलाच्या डान्समुळे.

हा व्हिडिओ मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी हिच्या प्री-वेडिंग सेरिमनीमधला असल्याचे म्हटले गेले होते. पण आता खुद्द शबाना आझमी यांनी या व्हिडिओमागचे सत्य सांगितले आहे.

होय, शबाना यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर याबाबत ट्वीट केले आहे. ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जावेदचा माझा व उर्मिलासोबतचा व्हिडिओ उदयपूर येथे अंबानीच्या सेलिब्रेशनमधला असल्याचा दावा केला जात आहे. पण सत्य हे आहे की, हा व्हिडिओ आमच्या खंडाळ्यातील ‘सुकून’ या घरातील आहे. शहाना व चिन्मयाज यांच्या लग्नातला आहे,’असे शबाना यांनी म्हटले आहे.जावेद व उर्मिलाच्या या व्हिडिओवरचे भन्नाट मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ७३ वर्षांच्या जावेद यांना पहिल्यांदा इतकी मस्ती करताना पाहिले गेले होते. जावेद व शबाना यांनी नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ९ डिसेंबर १९८४ मध्ये दोघांनीही लग्न केले होते.

टॅग्स :शबाना आझमीजावेद अख्तरउर्मिला मातोंडकर