Join us  

इमरान हाश्मीच्या 'आशिक बनाया आपने'चा सीक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 4:38 PM

'आशिक बनाया आपने'चा सिक्वेलही बनवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या सिनेमातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या सिनेमातील इमरान हाशमी आणि तनुश्री दत्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. 'आशिक बनाया आपने'मधील इमरान-तनुश्रीच्या रोमँटिक सीन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमातील त्यांच्या किसींग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती. या चित्रपटानंतरच इमरानला 'सिरियल किसर'चा टॅग मिळाला. आता 'आशिक बनाया आपने'चा सिक्वेलही बनवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

'आशिक बनाया आपने' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये इमरान हाश्मी नसल्याच्या बातम्या आहेत. खुद्द इम्रानने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयाचे कारण स्पष्ट झालेलं नाही. आता त्याच्या जागी सनी सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सनीने यापूर्वी 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'आदिपुरुष' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. येत्या काही दिवसांत सनी 'जंगली जंगली पंजाब'मध्ये दिसणार आहे. याशिवाय सनीच्या खात्यात 'रिस्की रोमियो' नावाचा चित्रपटही आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'आशिक बनाया आपने 2'चे नावही जोडलं गेलं आहे.

'Moviefied Bollywood' च्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, 'आशिक बनाया आपने 2' चे शूटिंग UK मध्ये केले जाणार आहे.  चित्रपटाला संगीत हिमेश रेशमिया देणार आहे. ज्यानं पहिल्या भागाला आपल्या संगिताद्वारे धमाकेदार बनवलं होतं. हा सीक्वलही मूळ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य दत्तच बनवणार आहे. आदित्यने अलीकडेच विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल स्टारर 'क्रॅक' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. सनी सिंग व्यतिरिक्त, चित्रपटाच्या इतर कलाकारांबद्दल कोणतेही अपडेट नाही.

'आशिक बनाया आपने' हा लव्ह ट्रँगल चित्रपट होता. त्याला रोमँटिक थ्रिलरही म्हणता येईल.  'आशिक बनाया आपने 2' ची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या चित्रपटाची लवकरच घोषणा होणार आहे. इमरान हाश्मीबद्दल सांगायचे तर, तो शेवटचा सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' मध्ये दिसला होता. येत्या काही दिवसांत तो हॉटस्टारच्या 'शोटाइम' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :इमरान हाश्मीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा