Join us  

Seema Sajdeh :  ‘या’ कारणामुळे झाला सोहेल खानचा घटस्फोट, एक्स वाईफ सीमा सजदेहनं केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 12:13 PM

Sohail Khan, Seema Sajdeh : मोठा मुलगा झाला होता नाराज... 21 वर्षाच्या निर्वाणला आईचा निर्णय आवडला नव्हता...

काही वर्षांआधी सलमान खान भाऊ अरबाज खान याचा घटस्फोट झाला होता आणि अगदी काही महिन्यांआधी सलमानचा  लहान भाऊ सोहेल खान ( Sohail Khan) आणि त्याची पत्नी  सीमा सजदेह (Seema Sajdeh) यांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला.  सोहेल व सीमाच्या 24 वर्षांचा संसारांचा असा ‘दी एण्ड’ व्हावा, हा सर्वांसाठीच धक्का होता. पण ‘दी एण्ड’ झाला आणि आता यामागच्या कारणांचाही खुलासा झाला आहे.नुकतीच सीमा सजदेहने नुकतीच ‘फॅब्युलस लाईफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स 2’ या शोमध्ये  हजेरी लावली होती. यावेळी तिने सोहेल खानशी घटस्फोट  का घेतला, याचा खुलासा केला. शोच्या सुरूवातीला सीमाने तिच्या घराबाहेरची ‘खान’ आडनावाची नेमप्लेट हटवली आणि केवळ सीमा आणि निर्वाण आणि योहान या दोन्ही मुलांची नावं असलेली नवी पाटी लावली. यावरूनच सोहल व सीमा यांच्यात आता काहीही उरलेलं नाही, हे स्पष्ट झालं.

मोठा मुलगा झाला होता नाराज...सोहेलशी घटस्फोट घेतल्यानंतर सीमाने आपल्या नावातून ‘खान’ आडनाव वागळण्याचा निर्णय घेतला. तिने घरावरची नेमप्लेट बदलली. पण यामुळे तिचा मोठा मुलगा निर्वाण चांगलाच नाराज झाला होता. 21 वर्षाच्या निर्वाणला आईचा हा निर्णय आवडला नव्हता. ‘ आपलं खान कुटुंब चौघांचं कुटुंब आहे. पण तू  खान आडनाव काढून नेमप्लेटवर आपल्या तिघांची नावं ठेवलीस.  त्याने काय फरक पडला? शेवटी आपण खानच आहोत आणि आपण खानच राहणार. अशाप्रकारे एका व्यक्तिचं नाव हटवणं योग्य नाही,’ असं तो आईला म्हणाला होता. यावर सीमाने त्याला समजावलं होतं. तिने सांगितलं,‘खान’ आडनाव नेमप्लेट वरून काढल्याचा निर्णय निर्वाणला आवडला नव्हता. पण ती त्याला समजवालं. आपण अजूनही एक कुटुंब आहोत हे मला मान्य आहे. पण आता मला माझ्या आयुष्यात पुढे जायला हवं.  सध्याच्या परिस्थितीत मी कुणीच नाही. ना सजदेह, ना खान. पण तू आणि तुझा धाकटा भाऊ योहानसोबत खान आडनाव कायम राहिल. मात्र इथून पुढे खान हे आडनाव माझ्यासोबत नसणार आहे.  मला आता माझ्या नावापुढे कोणत्याच आडनावाची गरज भासत नाही, असं मी त्याला म्हणाले होते.

का घेतला घटस्फोट‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ च्या दुस-या सीजनमध्ये इंडियन मॅचमेकिंगच्या सीमा टापारिया सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी  सीमा सजदेहला तिच्या घटस्फोटाबाबत विचारलं असता, सीमाने पहिल्यांदाच कारणांचा खुलासा केला. सोहेलसोबतचं नातं संपुष्ठात का आलं? असा प्रश्न सीमा आंटीने सीमा सजदेहला केला.  यावर कदाचित मला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून.., असं सीमा म्हणाली. तिचं हे उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले. परंतु नंतर सीमाने आपण मस्करी करत असल्याचं सांगितलं.  त्यानंतर तिने आपल्या घटस्फोटाचं खरं कारण सांगितलं.  आमच्या विचारात फारच अंतर होतं. आमचे विचार अजिबात पटत नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही विभक्त राहत होतो. आपला लहान मुलगा हे सर्व समजून घेण्यासाठी फारच लहान होता. पण  मोठा मुलगा निर्वाण आमच्या निर्णयाशी सहमत असल्याचं ती म्हणाली.  

सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी 1998 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. सीमाने 2000 मध्ये मोठा मुलगा निर्वाणला जन्म दिला होता. तर जून 2011 मध्ये सरोगसीद्वारे त्यांचा दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला आहे.लग्नाच्या तब्बल 24 वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

टॅग्स :सोहेल खानबॉलिवूडसलमान खान