Join us

अनुष्का शर्माच्या ‘परी’चा नवा प्रोमो बघून तुमची झोप उडेल, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 20:08 IST

अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ या हॉररपटाचा नवा प्रोमो बघून भल्याभल्यांचा थरकाप होणार आहे. या प्रोमोमध्ये अनुष्का खूपच भीतीदायक अंदाजात बघायला मिळत आहे.

होळी या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जे चित्रपट प्रदर्शित झालेत, ते बघून प्रेक्षकांच्या चेहºयावर हसू फुलले असेल. परंतु यंदा होळीला प्रेक्षकांना काहीतरी भलतेच बघावयास मिळणार आहे. हे बघून प्रेक्षकांच्या चेहºयावर हसू नव्हे तर भीती बघायला मिळेल. होय, अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी’ हा हॉररपट होळीला प्रदर्शित केला जाणार असून, आतापर्यंतच्या त्याच्या प्रोमोने थरकाप उडवून दिला आहे. आतापर्यंत चार शॉर्ट प्रोमो प्रदर्शित करण्यात आले असून, हे सर्वच प्रचंड भीतीदायक आहेत. आज या चित्रपटाचा पाचवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून, तो बघून प्रेक्षकांची झोप उडेल यात शंका नाही. ‘परी’च्या पाचव्या प्रोमोबद्दल सांगायचे झाल्यास, यामध्ये अनुष्का शर्मा एका काळोख्या रात्री फिरत असताना एक तलावाजवळ जाते. त्याठिकाणी तिला पाण्यात आपला चेहरा रक्ताने माखलेला दिसतो. त्यानंतर तलावात असलेले सर्व मासे मरतात व पाण्यावर तरंगतात. चित्रपटाचा हा नवा प्रोमो बघितल्यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वत्र ‘परी’ची चर्चा रंगली आहे. अनुष्काच्या ‘परी’चे वैशिष्ट्ये म्हणजे आतापर्यंत जेवढे हॉररपट प्रदर्शित झाले त्या सर्वांची कथा जवळपास सारखीच आहे. परंतु ‘परी’ची कथा हटके असल्याने प्रेक्षकांना एक नवा थरार अनुभवयास मिळणार आहे. अनुष्काने काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना खुलासा केला होता की, ‘परी’मध्ये माझे नाव रूखसाना असे असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला हा प्रश्न पडत आहे की, जर अनुष्काचे नाव रूखसाना आहे तर ‘परी’ हे कोणाचे नाव आहे? दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत करण्यात आली. अनुष्काचा तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गतचा हा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर ‘एन. एच. १०’ आणि ‘फिल्लोरी’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांना या हॉररपटाची प्रतीक्षा आहे.