Join us  

बळजबरीने प्रेमात पडू पाहणाऱ्या अमिषा पटेलला बघून ‘या’ सुपरस्टारने पार्टीतून काढला पळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 10:58 AM

अभिनेत्री अमिषा पटेलने बॉलिवूड प्रवासाला अठरा वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. आठ वर्षांच्या करिअरमध्ये अमिषाने ‘कहो ना प्यार है, गदर ...

अभिनेत्री अमिषा पटेलने बॉलिवूड प्रवासाला अठरा वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. आठ वर्षांच्या करिअरमध्ये अमिषाने ‘कहो ना प्यार है, गदर : एक प्रेम कथा आणि हमराज’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या या भूमिका इतक्या गाजल्या की, बॉलिवूडमध्ये एकेकाळी तिचे वजन वाढले होते. असो, आज आम्ही अमिषाच्या बॉलिवूड प्रवासाविषयी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ९ जून रोजी अमिषा तिचा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे, त्याच पार्श्वभूमीवर अमिषाच्या आयुष्याशी निगडित काही गोष्टींचे खुलासे आम्ही या वृत्तात करणार आहोत. बºयाच कमी लोकांना माहिती आहे की, ‘कहो ना प्यार है’मध्ये हृतिक रोशनसोबत काम करणारी अमिषा हृतिकचे वडील राकेश रोशन यांची चांगली मैत्रीण आहे. अमिषा पटेल गुजराती परिवारातील आहे. अमिषा भरतनाट्यम ट्रेंड डान्सर असून, गेल्या पाच वर्षांपासून ती हा डान्स शिकत आहे. अमिषा बॉलिवूड अभिनेता अश्मित पटेलची बहीण आहे. अमिषाने २००० या साली हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हायस्कूल पास होताच राकेश रोशन अमिषाला चित्रपटासाठी अ‍ॅप्रोच झाले होते. त्यावेळी अमिषाने त्यांना नकार दिला होता, कारण तिला पुढील शिक्षणासाठी यूएसला जायचे होते. त्यानंतर ही भूमिका करिनाला आॅफर करण्यात आली होती; मात्र तिनेही कुठल्यातरी कारणाने ती आॅफर नाकारली. ज्यानंतर अमिषालाच ही भूमिका देण्यासाठी प्रयत्न केले गेले. अखेर तिने ही भूमिका स्वीकारली. अमिषाने २००१ साली ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटात सनी देओलसोबत अतिशय दमदार भूमिका साकारली. या चित्रपटानंतर ती चांगलीच लाइम लाइटमध्ये आली. अमिषा पेटा या संस्थेशीदेखील जोडलेली आहे. एका जाहिरातीच्या माध्यमातून अमिषाने हे दाखवून दिले होते की, प्राण्यांना पिंजºयात कैद करून तुम्ही त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. अमिषा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना डेट करायची. असे म्हटले जाते की, २००२ मध्ये आलेल्या ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या चित्रपटानंतर दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली. जवळपास पाच वर्षं त्यांचे अफेअर चालले. त्यानंतर दोघे विभक्त झाले. विक्रम भट्टनंतर अमिषाचे नाव लंडन येथील बिझनेसमॅन कनव पुरी यांच्याशी जोडले गेले. हे नाते दोन वर्षं टिकले. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. असे म्हटले जाते की, या ब्रेकअपमुळेच अमिषाने स्वत:च्या करिअरकडे फोकस करणे बंद केले. अमिषाबद्दल हेदेखील म्हटले जाते की, एका पार्टीदरम्यान अमिषामुळे रणबीर कपूर पार्टी सोडून निघून गेला होता. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, हे दोघे एकाच पार्टीत होते. अमिषाला रणबीरसोबत एकांतात बोलायचे होते; मात्र ही बाब लोकांना समजण्याअगोदरच रणबीरने पार्टीतून काढता पाय घेतला होता. असे म्हटले जाते की, रणधीर कपूरच्या ७० वा वाढदिवसानिमित्त अमिषाने रणबीरसोबत एक फोटो क्लिक केला होता. ज्यानंतर या दोघांमध्ये लिंकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या; मात्र रणबीर या बातम्याम्ांुळे फारसा खूश नव्हता. शिवाय त्याला हेदेखील पुन्हा घडू द्यायचे नव्हते, त्यामुळेच त्याने पार्टीत अमिषाला टाळण्यासाठी तेथून निघून जाणे योग्य समजले. काही माध्यमांनी तर हादेखील दावा केला होता की, अमिषा बळजबरीने रणबीरच्या प्रेमात पडली होती.