Join us

‘या’ अभिनेत्रीच्या शाहीलग्नाचे पहा फोटो, बिझनेसमॅनसोबत केले लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST

‘काय पो चे’ आणि ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री अमृता पुरी विवाहाच्या बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच बॅँकॉक येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची काही छायाचित्र...!

‘काय पो चे’ आणि ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री अमृता पुरी विवाहाच्या बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच बॅँकॉक येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची काही छायाचित्र...!रिपोर्ट्सनुसार अमृताने तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड इमरून सेठी याच्यासोबत गेल्या ११ नोव्हेंबर रोजी लग्न केले.अमृताच्या लग्नाचे काही फोटोज् समोर आले असून, त्यात अमृता खूपच सुंदर दिसत आहे.२०१० अभिनेत्री सोनम कपूरसोबत ‘आयशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया अमृताने ‘काय पो चे’मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भूमिका साकारली होती.अमृताचा पती इमरून सेठी एक हॉटेलिअर आहे.इमरून आणि अमृता गेल्या काहीकाळापासून एकमेकांना डेट करीत होते.अमृताची क्लोज फ्रेंड पीओडब्ल्यूची को-स्टार संध्या मृदूल, सत्यदीप शर्मा, आयशा चोपडाने या दोघांचे लग्नाचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.पीओडब्ल्यूमध्ये अमृताच्या आॅनस्क्रीन पतीची भूमिका साकारणारा पूरब कोहली या लग्नात पोहोचू शकला नाही.मात्र पूरबने अमृताच्या लग्नाच्या फोटोंना खास त्याच्या अंदाजात कॉमेण्ट शेअर केल्या आहेत.पीओडब्ल्यूमध्ये अमृताने हरलीन कौरची भूमिका साकारली होती.