Join us

SEE PICS : श्रीदेवी मुलगी जान्हवीसोबत कॅलिफोर्निया येथे करीत आहे हॉलिडे एन्जॉय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 16:39 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी सध्या पती बोनी कपूर आणि दोन मुली खुशी आणि जान्हवी यांच्यासोबत लॉस एंजलिस येथे हॉलिडे एन्जॉय ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी सध्या पती बोनी कपूर आणि दोन मुली खुशी आणि जान्हवी यांच्यासोबत लॉस एंजलिस येथे हॉलिडे एन्जॉय करीत आहे. श्रीदेवीच्या या व्हेकेशनचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये जान्हवीचा अंदाज बघण्यासारखा आहे. जान्हवीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यात ती खूपच स्टायलिश दिसत आहे. श्रीदेवीचा नुकताच ‘मॉम’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नसला तरी, श्रीदेवीची भूमिका चांगलीच गाजली. समीक्षकांनी श्रीदेवीचे तोंडभरून कौतुक केले. दरम्यान, सध्या श्रीदेवी आपल्या परिवारासोबत लॉस एंजलिस येथे क्वॉलिटी टाइम स्पेंड करीत आहे. तिचे कॅलिफोर्निया येथे एन्जॉय करतानाचे मुलगी जान्हवीबरोबरचे काही फोटोज् समोर आले आहेत. फोटोमध्ये जान्हवी खूपच स्टायलिश आणि गॉर्जियस दिसत आहे. दोघींच्या फॅशनविषयी सांगायचे झाल्यास, दोघीही एकमेकींच्या तुलनेत जबरदस्त स्टायलिश आहेत. हे फोटो त्याचाच पुरावा म्हणावा लागेल. दरम्यान, सध्या जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. निर्माता करण जोहर तिला लॉन्च करणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. सुरुवातीला तो मराठीमधील सुपरहिट ‘सैराट’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून जान्हवी डेब्यू करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचदरम्यान सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने करणच्या चित्रपटातून डेब्यू करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, तिच्या जागी जान्हवीला संधी दिली जाणार असल्याची पक्की बातमी आहे. करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट आॅफ द इअर-२’मधून जान्हवी कपूर डेब्यू करणार आहे. दरम्यान, जान्हवी परिवारासोबत व्हेकेशन एन्जॉय करीत असून, भारतात परतल्यावर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जान्हवीला पडद्यावर बघण्यासाठी श्रीदेवीचे चाहते आतुर झाले आहेत.