Join us

SEE PICS : ​‘बॉयफ्रेन्ड’सोबत सावत्र आई करिनाच्या घरी पोहोचली सारा अली खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 13:52 IST

सारा अली खान सध्या जाम चर्चेत आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या या लाडक्या लेकीबद्दलची एखादी बातमी वा ...

सारा अली खान सध्या जाम चर्चेत आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या या लाडक्या लेकीबद्दलची एखादी बातमी वा फोटो दरदिवशी आपल्याला दिसतोच. काल सोमवारी रात्री सारा बाहेर पडली. त्याचीही बातमी झाली. अर्थात बाहेर पडली म्हणजे, आपल्या सावत्र आईच्या म्हणजेच करिना कपूरच्या घरी पोहोचली आणि तेही कथित बॉयफ्रेन्ड हर्षवर्धन कपूर याच्यासोबत. होय, ऐकता ते खरे आहे. करिनाने काल रात्री एक लहानशी पार्टी अरेंज केली होती. सारा या पार्टीला पोहोचली. एकटी नाही तर हर्षवर्धनसोबत. सारा व हर्षवर्धन एकाच गाडीतून करिनाच्या घरी पोहोचलेत. यावरून तरी सारा व हर्षवर्धनच्या नात्यावर संमतीची मोहोर लागली, असे आपण समजू या.गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटींगच्या बातम्या गाजत आहेत. अर्थात या बातम्या सारा व हर्षवर्धन स्वत:च तयार करत आहेत. कधी डिनर डेट, कधी पार्टी अशा निमित्ताने अलीकडे दोघेही एकत्र दिसू लागले आहेत. अगदी काल-परवा हर्षवर्धन मध्यरात्री साराच्या घराबाहेर आढळून आला होता.साराबद्दल बोलायचे झाल्यास, सारा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’या चित्रपटात साराच्या अपोझिट सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. कालच अभिषेक, सुशांत व सारा या तिघांना मुंबईत एका हॉटेलात पाहिले गेले. यावेळी त्यांच्यासोबत साराची आई अमृता सिंह ही सुद्धा होती. या हॉटेलात साराची डेब्यू फिल्म ‘केदारनाथ’वर चर्चा झाली. कदाचित साराने हा चित्रपट साईन केला आहे. मग याचे सेलिबे्रशन तर बनतेच. कदाचित म्हणूनच पापा सैफ अली खान याने हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एक पार्टी ठेवली असावी.