SEE PICS : दुखापतग्रस्त दिशा पटानीला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 22:23 IST
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या पायाला दुखापत झाली असून, ती चालताना वॉक स्टीकचा आधार घेत आहे. अशा काळात तिला सर्वाधिक ...
SEE PICS : दुखापतग्रस्त दिशा पटानीला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची साथ!
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या पायाला दुखापत झाली असून, ती चालताना वॉक स्टीकचा आधार घेत आहे. अशा काळात तिला सर्वाधिक साथ बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच टायगर आणि दिशा डिनर डेटला गेले होते. टायगरची साथ मिळत असल्याने दिशा तिची दुखापत विसरून गेली असून, त्याच्यासोबत फिरताना बघावयास मिळाली होती. आता पुन्हा एकदा या दोघांचे काही फोटोज् समोर आले असून, यामध्ये टायगर बिनधास्तपणे दिशाचा हात पकडून तिला आधार देताना दिसत आहे. वास्तविक या दोघांनी अद्यापपर्यंत एकही चित्रपट केलेला नाही. केवळ एका गाण्यात हे दोघे झळकले आहेत. शिवाय लवकरच एका चित्रपटात बघावयास मिळतील. मात्र अशातही त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा जोरदार रंगत असतात. मीडियामध्ये हे कपल अशा पद्धतीने चर्चिले जाते की, जणूकाही त्यांनी डझनभर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दररोज त्यांच्याविषयी एक तरी बातमी समोर येत असल्याने त्यांच्यात काहीतरी असावे, असा अंदाज व्यक्त केला गेला. परंतु अशातही त्यांनी मैत्रीपलीकडे त्यांच्यात दुसरे नाते नसल्याचे सांगितले. मात्र आता समोर आलेल्या फोटोंवरून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खिचडी शिजत असावी, असेच दिसून आले. फोटोमध्ये दोघे रस्ता क्रॉस करताना बघावयास मिळत आहेत. दिशाचा पाय दुखापतग्रस्त असून, त्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. हातात स्टिक वॉक असल्याने तिला चालताना त्रास होत आहे. मात्र टायगरची साथ असल्याने ती हा रस्ता सहज पार करीत असल्याचे फोटोंमध्ये दिसून येते. काही फोटोंमध्ये तर टायगर दिशाचा हात धरून तिला आधार देत आहे. हे फोटो बघून एक मात्र निश्चित सांगता येईल की, टायगर दिशाची प्रचंड काळजी घेतो. शिवाय दोघांनाही एकमेकांची कंपनी प्रचंड आवडते. त्यामुळे या दोघांनी जरी त्यांच्या नात्याला मैत्रीचे नाव दिले असले तरी, लोकांना त्यांच्यातील नाते नक्कीच समजले असेल. काही वेळापूर्वीच टायगरने दिशासोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली. त्याने म्हटले की, ‘मी या चित्रपटामुळे खूपच उत्साहित आहे. मी दिशाला बºयाच काळापासून ओळखतो. त्यामुळे दिशासोबत काम करताना मला आनंद वाटेल. कारण ती स्क्रीनवर खूपच नॅचरल दिसते.’