SEE PICS : दिल्लीला जाताना रडणाºया तैमूरच्या चेहºयावर मुंबईत परताच फुलले हास्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:40 IST
अभिनेत्री करिना कपूर-खान सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करिना शूटिंगदरम्यान तिच्या लाडक्या तैमूरलाही ...
SEE PICS : दिल्लीला जाताना रडणाºया तैमूरच्या चेहºयावर मुंबईत परताच फुलले हास्य!
अभिनेत्री करिना कपूर-खान सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करिना शूटिंगदरम्यान तिच्या लाडक्या तैमूरलाही सोबत घेऊन जात असल्याने तोही सध्या शूटिंग एन्जॉय करीत आहे. काही दिवसांपूर्वीच करिना तैमूरला घेऊन दिल्लीला गेली होती. परंतु दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर येताच तैमूर रडायला लागला. काहीही केल्यास तैमूर रडणे थांबविण्याचे नाव घेत नव्हता. रडून रडून त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. पहिल्यांदाच रडताना कॅमेºयात कैद झालेल्या तैमूरचे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले होते. आता मॉम करिनाने दिल्लीतील शूटिंग उरकली असून, ती नुकतीच मुंबईत परतली आहे. परंतु यावेळेस जेव्हा तैमूर स्पॉट झाला तेव्हा त्याच्या चेहºयावर हास्य फुलले होते. तैमूरचे हे फोटो बघून करिनाच्या चाहत्यांचा दिवस चांगला गेला नसेल तरच नवल. खरं तर जेव्हा मॉम करिना तैमूरला घेऊन दिल्लीला जात होती, तेव्हा तैमूरचा मुड फारसा चांगला नव्हता. त्यामुळे तो रडत रडतच दिल्लीला रवाना झाला. मात्र दिल्लीतून मुंबईत परताच तैमूरच्या चेहºयावरील हास्य बघण्यासारखे होते. मॉम करिनाच्या कडेवर तैमूर खूपच खूश दिसत होता. हाफ फॉर्मलमध्ये करिना, तर ब्लू चेक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तैमूर बघावयास मिळाला. दरम्यान, करिनाने दिल्लीत केलेल्या ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल साइट पोस्ट केला आहे. दरम्यान, करिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्सकडून त्यास चांगली पसंतीही मिळत आहे. व्हिडीओमध्ये करिना आपल्या लाडक्या तैमूरविषयी सांगत आहे की, लोकांना जाणून घ्यायचे आहे की, तैमूर अखेर कुठे आहे? पुन्हा मॉम करिना म्हणताना दिसते की, ‘तैमूरला सेटवर बॅन आहे.’ असो, तैमूरचे हे हसतमुख फोटो त्याच्या इतर फोटोंप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.