SEE PICS : बॉलिवूडच्या या ‘हॉट’ अभिनेत्रींनी ‘बॉडी शेमिंग’ला दिले तोंड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST
बॉलिवूड म्हणजे मोहात पाडणारी दुनिया. या दुनियेत टिकायचे असेल तर इतर सेलिब्रिटींना स्वत:पेक्षा गौण लेखणे गरजेचे असते. तरच तुम्ही किती हॉट आणि सुंदर आहात, हे समोर येत असतं. अनेकवेळा चाहतेच सोशल मीडियावरील अभिनेत्रींच्या फोटोंना ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस देत असतात. पाहूयात अशा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेकवेळेस ‘बॉडी शेमिंग’ ला तोंड दिले आहे.
SEE PICS : बॉलिवूडच्या या ‘हॉट’ अभिनेत्रींनी ‘बॉडी शेमिंग’ला दिले तोंड !
बॉलिवूड म्हणजे मोहात पाडणारी दुनिया. या दुनियेत टिकायचे असेल तर इतर सेलिब्रिटींना स्वत:पेक्षा गौण लेखणे गरजेचे असते. तरच तुम्ही किती हॉट आणि सुंदर आहात, हे समोर येत असतं. अनेकवेळा चाहतेच सोशल मीडियावरील अभिनेत्रींच्या फोटोंना ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस देत असतात. पाहूयात अशा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेकवेळेस ‘बॉडी शेमिंग’ ला तोंड दिले आहे.प्रियांका चोप्रा हे नाव आता केवळ देशपातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर घेतले जाते. तिचे चित्रपट, तिचे व्यक्तीमत्त्व नेहमीच देशासाठी अभिमानास्पद बाब राहिलेली आहे. मात्र, अलीकडेच तिने देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेटायला गेले असता अतिशय शॉर्ट असा ड्रेस घातला होता. तेव्हा सोशल मीडियावर तिला ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस मिळाल्या. तसेच लिप सर्जरी आणि नोज सर्जरी केल्यामुळे देखील तिला अनेकांची नाराजी पत्करावी लागली होती. दीपिका पादुकोण हिला सोशल मीडियावर खूप जास्त वजन कमी करण्याच्या कारणावरून बॉडी शेमर म्हणण्यात आले. एका ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटमधील तिचा एक खूप कमी वजनाचा आणि वीक असलेला फोटो शेअर केला. ‘थिन अॅण्ड वीक’ अशा प्रतिक्रियेबरोबरच तिला ‘व्हल्गर’ फोटोशूट अशीही कमेंट मिळाली. सोनम कपूर हिला बॉलिवूडची मस्सकली गर्ल म्हणून आपण ओळखतो. तिला तिच्या अनेक फोटोंमुळे आत्तापर्यंत निगेटिव्ह कमेंटस मिळाल्या आहेत. तिला मीडियामधूनही अनकम्फर्टेबल अशा कमेंटस मिळाल्या आहेत. तसेच ‘सेक्सिएस्ट नॉनसेंन्स’. अशा कमेंटसमुळे मला फरक पडत नाही. उलट, मला माझ्या बॉडीचा अभिमानच आहे. फातिमा सना शेख हिला अलीकडेच तिच्या काही फोटोमुळे सोशल मीडियावर विविध कमेंटस मिळाल्या. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट अवतारात फोटो पोस्ट केले होते. नेमके हे फोटो तिने रमजानच्या महिन्यात पोस्ट केले होते. ते अनेकांना आवडले नाहीत. त्यानंतर तिला निगेटिव्ह कमेंटस मिळाल्या. क्रिती सॅनन ही सध्या तिच्या राब्ता आणि बरेली की बर्फीसाठी जाम चर्चेत आहे. पण भैरवी गोस्वामी या एका अभिनेत्रीने तिला अतिशय वाईट कमेंट दिली. ती म्हणाली,‘नो हेडलाईट, नो बंपर’ अशा उदगारात तिने क्रितीला बॉडी शेमिंग वक्तव्य केले. दिशा पटानी हिचं नाव टायगर श्रॉफसोबत जोडले जाते. अलीकडेच ती तिच्या एका फोटोमुळे ट्रोल झाली. एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये तिने घातलेला ड्रेस सर्वांच्या चर्चेचा मुद्दा ठरला. सोशल मीडियावर तर तिला खूप वाईट कमेंटस मिळाल्या आहेत.