SEE PICS : करण जोहरच्या पार्टीला आलिया, दीपिका, क्रितीने लावले ‘चार चाँद’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 11:00 IST
काल २५ मे रोजी करण जोहर ४५ वर्षांचा झाला. मग काय, बर्थ डे सेलिब्रेशन तो बनता ही है ना? ...
SEE PICS : करण जोहरच्या पार्टीला आलिया, दीपिका, क्रितीने लावले ‘चार चाँद’!
काल २५ मे रोजी करण जोहर ४५ वर्षांचा झाला. मग काय, बर्थ डे सेलिब्रेशन तो बनता ही है ना? काल रात्री करण जोहरच्या बर्थ डेची ग्रॅण्ड पार्टी रंगली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. पण यात सगळ्यांत लक्ष वेधले ते बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडने. होय, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, त्याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल, टागयर श्रॉफ, दिशा पटनी, सुशांत सिंह राजपूत, क्रिती सॅनन, दीपिका पादुकोण अशा सगळ्यांनी करणच्या पार्टीत स्टाईलिश हजेरी लावली. दीपिका, आलिया, क्रिती अशा अनेकींचा ग्लॅमरस अंदाज यावेळी बघण्यासारखा होता. चुलबुली आलिया भट्ट करणच्या पार्टीत तिचा आवडता डिझाईनर प्रबल गुरुंग याने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. प्रिंटेड सिल्क जॅकवार्ड व्ही नेक ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. लाईट मेकअप, केसांचा बन आणि लाईट पिंक लिपस्टिक अशा अवतारात आलियाकडे बघतच राहावे, असे तिने स्वत: कॅरी केले होते. नुकतीच कान्सवरून परतलेली दीपिका पादुकोण यावेळी ब्लॅक कलरच्या मिनी ड्रेसमध्ये पोहोचली. शलिना नथानीने डिझाईन केलेल्या या ड्रेससोबत दीपिकाने कॅरी केला होता तो बोल्ड आय मेकअप. दीपिका या अवतारात प्रचंड ग्लॅमरस अवतारात दिसली. क्रिती सॅनन यावेळी मल्टी कलर्ड स्ट्रिप शॉट टॉप आणि नेव्ही कलरच्या स्कर्ट पॅन्टमध्ये दिसली. राहुल मिश्राने डिझाईन केलेल्या या ड्रेसमध्ये क्रितीचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते. आदिती राव हैदरी यावेळी जम्पसूटमध्ये पोहोचली. पोनी टेल, बोल्ड आय मेकअप अशा बोल्ड अवतारात आदिती करणच्या पार्टीत पोहोचली.