Join us

SEE PIC : एकमेकांच्या मोबाइलची जासूसी करताना स्पॉट झालेत सुशांत सिंग राजपूत अन् क्रिती सॅनन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 21:29 IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्यात काही तरी सुरू असल्याच्या चर्चा जरी त्यांच्याकडून नाकारली जात असली ...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्यात काही तरी सुरू असल्याच्या चर्चा जरी त्यांच्याकडून नाकारली जात असली तरी, दोघांमधील हावभाव बघता हे दोघे एकमेकांना प्रचंड पसंत करीत असावेत असेच काहीसे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. शिवाय या दोघांना एकमेकांसोबत वेळ व्यतीत करायलाही आवडत असल्याने दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असावे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘राब्ता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या हे दोघे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत; मात्र प्रमोशनपेक्षा हे दोघे हॉटेल किंवा कॉफी शॉपमध्येच अधिक प्रमाणात स्पॉट होत असल्याने त्यांच्यातील रोमान्सविषयी जोरदार चर्चा रंगत आहे. कदाचित हा त्यांच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हल्ली हटके पद्धतीने प्रमोशन करण्याचा ट्रेण्डच आला असल्याने, हा त्यांचा प्रमोशन फंडा असावा अशी शंका उपस्थित केली जात आहे. नुकतेच सुशांत आणि क्रिती एका कॉफी शॉपमध्ये स्पॉट झाली. कॉफी पिताना त्यांच्यात चर्चा रंगल्याचे दिसत होते. त्याचबरोबर हे दोघे एकमेकांच्या मोबाइलमध्ये जासूसीही करीत असल्याचे दिसत होते. दोघेही एकमेकांचा फोन बघत होते. दोघांचे वावरणे खूपच मोकळे असल्याने त्यांना एकमेकांना सहवास भावत असावा असेच दिसून येत आहे. खरं तर या दोघांमधील केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सना चांगलीच आवडत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्येच नव्हे तर फॅन्समध्येदेखील त्यांच्यातील अफेअरची चर्चा रंगत आहे. ‘राब्ता’च्या ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने दोघांची ट्यूनिंग आहे, त्यावरून हा चित्रपट चांगला गल्ला जमविण्यात यशस्वी होईल, असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे.