Join us

पहा रेखाचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:58 IST

अ‍ॅवॉर्ड सोहळ््यांची लगबग आता सगळीकडेच दिसू लागली आहे. कलाकारांसाठी हे अ‍ॅवॉर्ड सोहळे फारच महत्वपूर्ण असतात. आपण केलेल्या कामाची दखल ...

अ‍ॅवॉर्ड सोहळ््यांची लगबग आता सगळीकडेच दिसू लागली आहे. कलाकारांसाठी हे अ‍ॅवॉर्ड सोहळे फारच महत्वपूर्ण असतात. आपण केलेल्या कामाची दखल पुरस्कारांच्या माध्यमातून या कलाकारांना मिळते. त्यामुळे आपल्याला पुरस्कार मिळावा असे प्रत्येक कलाकारालाच वाटत असते. नुकताच स्टारस्क्रिन अ‍ॅवॉर्ड सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ््यातील विजेत्यांची यादी आम्ही तुमच्यासाठी शेअर करीत आहोत... . या  पुरस्कार साहेळ््यात अभिनेत्री रेखाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर रेखाने तिच्या दिलखेच नृत्याने सर्वांनाच घायाळ केले.  सर्वोत्कृष्ट चित्रपट- पिंकसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राम माधवानी (नीरजा)सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिंक)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (उडता पंजाब)सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)- सुशांत सिंग राजपूत (एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)- स्वरा भास्कर (निल बटे सन्नाटा)सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- टिनू सुरेश देसाई (रुस्तम)सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- वरुण धवन (ढिशूम)सर्वोत्कृष्ट बालकलाकार- रिया शुक्ला (निल बटे सन्नाटा)सर्वोत्कृष्ट न्युकमर (पुरुष)- जिम सारभ (नीरजा), हर्षवर्धन कपूर (मिर्ज्या)सर्वोत्कृष्ट न्युकमर (स्त्री)- दिशा पटानी (एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ऋषी कपूर (कपूर अ‍ॅण्ड सन्स)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (नीरजा)सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्या (ऐ दिल है मुश्किल)सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- प्रितम चक्रवर्ती (ऐ दिल है मुश्किल)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अमित मिश्रा (बुल्लेया- ऐ दिल है मुश्किल)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- पलक मुछाल (कौन तुझे- एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी)सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- बॉस्को-सीझर (काला चष्मा- बार बार देखो)सर्वोत्कृष्ट संकलन- आदित्य बॅनर्जी (पिंक)सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- अनय गोस्वामी (फितूर)सर्वोत्कृष्ट थरारदृश्ये- जय सिंग निज्जर (शिवाय)सर्वोत्कृष्ट पटकथा- सायविन क्वाड्रास (नीरजा)सर्वोत्कृष्य संवाद- रितेश शाह (पिंक)स्टार प्लस नई सोच अवॉर्ड- आलिया भट्टजीवनगौरव पुरस्कार- रेखा