Join us  

SEE HOT PIC : दीपिका पादुकोणच्या या हॉट अ‍ॅण्ड सेक्सी फोटोंनी तुुम्ही व्हाल घायाळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 3:05 PM

बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका पादुकोण हिने इंडस्ट्रीत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ...

बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका पादुकोण हिने इंडस्ट्रीत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांना अक्षरश: घायाळ केले आहे. कुठलीही भूमिका असो, त्यामध्ये दीपिकाचा अंदाज नेहमीच निराळा राहिला आहे. तिच्या सौंदर्यावर तर अनेकजण फिदा आहेत. आज आम्ही तुम्हाला दीपिकाचे असेच काही फोटोज् दाखविणार आहोत, ज्यावरून तुम्हीही म्हणाल की, दीपिकाच बॉलिवूडची सेक्स सिम्बॉल आहे. खरं तर दीपिका कुठल्याही आउटफिटमध्ये असो तिचे सौंदर्य नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यातही जर ती टाइट फिटिंग कपड्यांमध्ये बघावयास मिळाली तर, तिचे सौंदर्य आणखीच खुलून दिसते. सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राब्ता’ या चित्रपटात दीपिकाचा असाच काहीसा कातिलाना अंदाज बघावयास मिळाला. या चित्रपटात दीपिकाने टायटल साँगवर ठुमके लावले असून, त्यातील तिच्या अदा प्रेक्षकांना घायाळ करतील यात शंका नाही. जेव्हा दीपिकाने या गाण्याचे शूट केले तेव्हा चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेला सुशांतही अवाक् झाला. दीपिकाच्या सौंदर्यावर तो असा काही लट्टू झाला की, त्याची गर्लफ्रेण्ड क्रिती सॅनन हिने त्याला हे गाणे बघण्यासच मनाई केली. या गाण्यातील दीपिकाच्या सेक्सी मूव्स आणि ठुमके बघून प्रेक्षकही सुशांतप्रमाणे तिच्यावर लट्टू होणार आहेत.  विशेष म्हणजे दीपिकाचा डान्सवर चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजन हेही भलतेच खूश असल्याचे समजते. याविषयी दिनेश यांनी सांगितले की, दीपिका माझ्यासाठी खूपच लकी आहे. ती सध्या आमच्यासोबत काम करीत आहे. जेव्हा मी तिला आमच्यासोबत काम करण्याविषयी विचारले तर ती लगेचच बुडापेस्ट आली अन् तिने शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटाचे निर्माता होमी अदाजानिया असून, प्रीतम यांनी चित्रपटातील गाणी कम्पोज केली आहेत. चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये सुशांत आणि क्रिती यांची केमिस्ट्री रंगली आहे. शिवाय चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांमध्ये गुफ्तगु सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.