Join us  

सैयामी खैर आहे ह्या मराठी अभिनेत्रीची नात, त्यांच्या चित्रपटांतून घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 6:30 AM

अभिनेत्री सैयामी खैर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्दे सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची आहे नात तन्वी आझमी सैयामीची आहे आत्या

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

सैयामीचे मराठीशी नाते असून या चित्रपटाच्या निमित्ताने ती मराठी संस्कृतीशी जोडली गेली आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे, बऱ्याच जणांना हे ठाऊक नाही की सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. माऊली हा तिचा पहिला मराठी चित्रपट असल्यामुळे सैयामीने पूर्ण तयारी केली असून, जरा ही उणीव ठेवली नाही. एवढेच नव्हे सैयामीने तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिले आहेत. त्यातही तिने गाजलेल्या चित्रपटांवर जास्त भर दिला आहे. या चित्रपटांचे तिने बारकाईने निरीक्षण केले असून त्याचा फायदा तिला माऊली चित्रपटासाठी होईल. आणखीन एक बाब म्हणजे अभिनेत्री तन्वी आझमी सैयामीची आत्या आहे आणि त्यांनी रितेश सोबत लय भारी चित्रपटात काम केलेले आहे. या चित्रपटात त्यांनी रितेशच्या आईची भूमिका केली होती.याबाबत सैयामी सांगते, 'माझी आजी उषा किरण आणि त्यांच्या कामाची मी एक मोठी प्रशंसक आहे. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला आवडले असते. मी त्यांचे चित्रपट पाहून बरेच काही शिकले आहे आणि मला आशा आहे की मी त्यांच्या नावाचा आदर राखेल.'

टॅग्स :रितेश देशमुखमाऊलीसंयमी खेर