Join us  

ऋषी कपूर म्हणतायेत, All Is Well...! लवकरच देणार गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 5:30 PM

अभिनेते ऋषी कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत असून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देऋषी कपूर लवकरच परतणार भारतात

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. मात्र नीतू कपूर व मुलगा रणबीर कपूर नेहमीच त्यांच्यासोबत असतात हे फोटोत पाहायला मिळतात. त्यातून असे समजते की कठीण काळात त्यांच्यासोबत ते दोघे सोबत आहेत. ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी सामना करत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भलेही ऋषी कपूर अमेरिकेत असले तरीदेखील ते इथली खबर घेत असतात. नुकतेच त्यांनी त्यांचे शेजारी मधु पोपलई यांच्याशी वार्ता केली. या बातचीतमध्ये ऋषी यांनी मधु यांना सांगितले की, मी बरा होत असून काही दिवसांमध्ये मुंबईत परतणार आहे. 

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, मधु पोपलईने या वार्ताला दुजोरा देत सांगितले की ऋषी यांचे व्हॉट्सअॅपवर बातचीत झाली आहे आणि लवकरच मुंबईत परतणार असल्याचे सांगितले. ऋषी कपूर लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूर