Join us

Save Aarey : बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:44 IST

आरेत मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी वृक्षतोडीला हिरवा कंदिल देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल सर्वच स्थरांवरून नाराजी व्यक्त होत आहे.

आरेमध्ये मेट्रोचं कारशेड उभारण्यासाठी जवळपास अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र या सर्व याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला आरेला वाचवण्यासाठी सर्वसमान्य जनता रस्त्यावर उतरली. त्यांच्यासह कलाकारांनीही आरेला वाचवण्यासाठी जनतेसह आंदोलनात सहभाग घेतला.

 

अखेर आरेला वाचवण्यात अपयशच आलं.  ‘रात्रीच्या वेळात सर्रास    आरेमधील झाडे तोडली जात आहेत.  वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. तसेच आता बॉलिवूडसह मराठी कलाकारही सोशल मीडियाद्वारे सरकारविरोधात संताप  करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

आरेत मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी वृक्षतोडीला हिरवा कंदिल देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल सर्वच स्थरांवरून नाराजी व्यक्त होत आहे.

 

 

 

टॅग्स :प्रियदर्शन जाधवउर्मिला मातोंडकर