Join us  

Satish Kaushik यांच्या निधनानंतर अशी आहे पत्नी आणि मुलीची अवस्था, पुतण्याने केला खुलासा; म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 1:07 PM

पुतण्या म्हणाला की, कुटुंबियांची अवस्था सध्या वाईट आहे.

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. 66 वर्षीय सतीश दिल्लीत होळीच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी त्यांचा जवळचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी दिली. सतीश कौशिक यांचं पार्थिव दिल्लीहून मुंबईत आणण्यात आले आणि मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, त्यांचा पुतण्या निशांतने, कुटुंबाबद्दल आणि सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका यांच्याबद्दल बोलले.

एका मुलाखती दरम्यान बोलताना, सतीश कौशिकचा पुतण्या निशांतनं खुलासा केला की दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबाचं आयुष्यच थांबलं आहे. त्यांची पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका अभिनेत्याचे निधन झाल्याचं सत्य स्विकारण्याचा प्रयत्न करत आहेत. तो असेही म्हणाला की, वंशिका पाहुण्यांसमोर काहीच बोलत नाही  पण ज्याक्षणी ती एकटी असते तेव्हा तिला अस्वस्थ वाटतं. शशी काकी (सतीश कौशिक यांच्या पत्नी) या शांत असतात आणि जुन्या आवठवणींमध्ये रमतात. कुटुंबियांची अवस्था सध्या वाईट आहे. 

निशांतने पुढे खुलासा केला की, ते वंशिकासोबत खूप खेळ खेळायचा. दरम्यान, वंशिकाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या वडिलांसोबतचा आनंदी फोटो पोस्ट केला आहे. निशांतनेच  सतीश कौशिक यांना अग्नी दिला आहे.  

सतीश कौशिक यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक कलाकार अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले होते. सलमान खान, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, जावेद अख्तर, फरहान अख्तर, शहनाज गिल, रझा मुराद, राकेश रोशन यांच्यासह सर्व सेलिब्रिटींनी सतीश कौशिश यांना जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. 

टॅग्स :सतीश कौशिक