Join us  

माझ्या लेकीसाठी प्रार्थना करा...! पाच दिवसांपासून सतीश कौशिक यांची मुलगी रूग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 7:04 PM

मुलीचा रडतानाचा आवाज ऐकून सतीश यांनाही अश्रू आवरत नाही. तिला भेटण्यासाठी त्यांचे काळीज तुटतेय. पण...

ठळक मुद्देआपल्या अनुभवातून सतीश कौशिक यांनी सर्वांना आपल्या मुलांचे आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. 

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रूग्णालयातही भरती करण्यात आले होते. आता सतीश कौशिक रूग्णालयातून घरी परतले आहेत. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटीव्ह आला आहे. पण मुलीच्या चिंतेने सतीश सैरभैर झाले आहेत. सतीश यांची 8 वर्षाची लेक वंशिका रूग्णालयात आहे.

वंशिकामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली. पण तिचा ताप मात्र वाढत आहे. पाच दिवसांपासून वंशिका रूग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. लेक सतत रडतेय. फोनवरून तिचा रडण्याचा आवाज ऐकून सतीश कौशिक यांचे काळीज तुटतेय.बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, माझ्या लेकीसाठी प्रार्थना करा, असे सतीश कौशिक यांनी म्हटले आहे.‘ मला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण मी अद्याप क्वारंटाइन आहे. यादरम्यान माझी मुलगी वंशिका पाच दिवसांपासून रूग्णालयात आहे. तिचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरीही तिचा ताप उतरत नाहीये,’ असे त्यांनी सांगितले. शिवाय प्लीज तिच्यासाठी प्रार्थना करा, असेही ते म्हणाले.

डॉक्टरांना वंशिकाच्या तापामागील कारण कळायला अडचणी येत आहेत. तिला 100 ते 101 डिग्री ताप आहे. ती रोज फोन करून त्यांच्याशी बोलते. परंतु, बोलताना ती वडिलांना भेटण्यासाठी हट्ट करते आणि रडते. मुलीचा रडतानाचा आवाज ऐकून सतीश यांनाही अश्रू आवरत नाही. तिला भेटण्यासाठी त्यांचे काळीज तुटतेय. पण ते सध्या काहीच करू शकत नाहीत.

टॅग्स :बॉलिवूड