श्रिया सरन रशियन बॉयफ्रेंडसोबत गुपचुप अडकली विवाह बंधनात, लग्नाचे फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:15 IST
दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या रशियन बॉयफ्रेंडसोबत गुपचुप विवाह केला आहे. 12 मार्च 2018 ला जवळच्या लोकांच्या उपस्थिती ...
श्रिया सरन रशियन बॉयफ्रेंडसोबत गुपचुप अडकली विवाह बंधनात, लग्नाचे फोटो झाले व्हायरल
दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या रशियन बॉयफ्रेंडसोबत गुपचुप विवाह केला आहे. 12 मार्च 2018 ला जवळच्या लोकांच्या उपस्थिती तिचा लग्न सोहळा पार पडला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधून शबाना आझमी आणि मनोज वायपेयीने हजेरी लावली होती. श्रियाने एंड्रे कोसचीवसह हिंदू-रिती रिवाजप्रमाणे लग्न केले. श्रियाच्या लग्ना दरम्यानचा फोटो समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिचे लग्न मुंभईतल्या लोखंडवाल्या परिसरात असलेल्या घरी झाले. ज्या ठिकाणी फक्त जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीय उपस्थित होते. आधी अशी चर्चा होती की श्रिया लग्न उदयपूरला ‘डेस्टीनेशन वेडिंग’. मात्र त्यानंतर तिने या चर्चांचे खंडन केले. श्रियाचा नवरा एंड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. याशिवाय अँड्री राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटुही आहे. एंड्री रशियात आई आणि भावासोबत सेंट पीटर्सबर्ग येथे राहतो. त्याला २०१५ मध्ये सर्वोत्कृष्ट युवा व्यावसायिकाचा पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. श्रिया सरनने बॉलिवूडमध्ये जास्त केले नसले तरीही दाक्षिणात्य सिनेसृष्टीती खूप लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रियाने बॉलिवूड सिनेमासोबतच अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड सिनेमांत काम केले आहे. तिने आतापर्यंत 'तुझे मेरी कसम','थोडा तुम बदलो थोडा हम', 'शुक्रिया', 'आवारापन', 'मिशन इस्तंबुल' ‘जिला गाजियाबाद’, ‘गली गली में चोर है’ या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या सिनेमांमध्ये श्रियाने अजय देवगनसोबत दृश्यम सिनेमात केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले होते.सिनेमातील इतर भूमिकाप्रमाणे श्रियाने साकारलेली भूमिकेनेही रसिकांची पसंती मिळवली होती. ‘दृश्यम’ हा सिनेमा सुपर हिट ठरला होता.श्रियाने ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला.या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती.२००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत झळकले होते