Join us  

​सारा अली खान डेब्यूसाठी तयार! सुशांतसिंह राजपूतसोबत झाली स्पॉट ! !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2017 4:39 AM

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या डेब्यूची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा ...

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या डेब्यूची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे यावेळची बातमी अगदी कन्फर्म आहे. सारा अली खान काल एका रेस्टॉरंट बाहेर दिसली.आता रेस्टारंट बाहेर साराचे दिसणे आणि तिचा बॉलिवूड डेब्यू याचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर संबंध आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये सारा एकटी नव्हती तर तिच्यासोबत होता, सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर. होय, सारा अभिषेक दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी होती. यात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार, हेही समोर आले होते. अखेर ही बातमी खरी ठरली. सुशांत व अभिषेकसोबत साराची पहिली मीटिंग अखेर झाली. आता केवळ या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. ‘काई पोचे’यानंतर अभिषेकसोबत सुशांतचा हा दुसरा चित्रपट असेल.सारा तिच्या पहिल्या चित्रपटाआधीच बरीच लोकप्रीय झाली आहे. बॉलिवूड पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये ती एक ओळखीचा चेहरा बनली आहे. काल रेस्टॉरंटबाहेरचे साराचे फोटो बघाल तर ती त्यात कमालीची सुंदर दिसतेय. ग्रे रंगाच्या सॅटीन ड्रेस आणि सोबत न्यूड हिल्स या लूकमध्ये सारा चांगलीच ग्लॅमरस दिसत होती. साराच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहेत. अखेर ही प्रतीक्षा संपली म्हणायची. सैफ आणि अमृता सिंहची स्टार डॉटर साराचा बॉलिवूड डेब्यू ठरला म्हणायचा. आता हा चित्रपट लवकरात लवकर सुरु व्हावा, इतकीच काय ती अपेक्षा.