योगा क्लासमधून परतणाऱ्या सारा अली खानचा दिसला असा अंदाज, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 16:36 IST
मोस्ट अवेटेडे चेहºयांपैकी एक असलेल्या सारा अली खानचा एक व्हिडीओ समोर येत असून, त्यात ती योगा क्लासमधून परताना दिसत आहे. यावेळी साराचा अंदाज बघण्यासारखा आहे.
योगा क्लासमधून परतणाऱ्या सारा अली खानचा दिसला असा अंदाज, पाहा व्हिडीओ!
सारा अली खान बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड चेहºयांपैकी एक आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी असलेली सारा लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. यामध्ये ती अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर ती रोहित शेट्टी यांच्या ‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबतही झळकणार आहे. सारावर मीडिया आणि तिच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते. त्यामुळेच तिचे व्हिडीओ आणि फोटोज् माध्यमांमध्ये सातत्याने समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक लग्न सोहळ्यात ‘सात समंदर’ या गाण्यावर डान्स करताना बघावयास मिळाली होती. तिचा हा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड व्हायरलही झाला होता. आता आणखी तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, तोही सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सारा रात्रीच्या वेळेस योगा क्लासमधून परताना दिसत आहे. या व्ंिहडीओमध्ये तिच्यासोबत गायिका कनिका कपूरही बघावयास मिळत आहे. हा व्हिडीओ रात्रीचा असून, सारा योगा क्लासची प्रॅक्टीस करून परताना दिसत आहे. २४ वर्षीय सारा सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. यासाठी ती तिच्या बॉडीला टोन करीत आहेच, शिवाय आपल्या डान्सवरही विशेष मेहनत घेताना दिसत आहे. दरम्यान, साराचा ‘सिम्बा’ हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तिचा हा चित्रपट ‘टेम्पर’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. सारा अली खानने २०१६ मध्ये न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सैफ अली खानची सुरुवातीपासूनच ही इच्छा होती की, साराने अगोदर तिचे शिक्षण पूर्ण करावे. त्यानंतरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवावे.