Join us

बरं झालं आई-बाबांचा घटस्फोट झाला...! सारा अली खानने मानले  देवाचे आभार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 14:30 IST

सैफ अली खान व अमृता सिंगची लेक सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत, रणवीर सिंग, कार्तिक आर्यननंतर सारा अली खान आता अक्षय कुमार व धनुष सोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'अतरंगी रे'

सैफ अली खान व अमृता सिंगची लेक सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. लाघवी, विनम्र पण तरीही परखड अशी साराची प्रतीमा आहे. तूर्तास सारा ‘लव्ह आज कल’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान एका ताज्या मुलाखतीत साराने तिच्या मॉम-डॅडच्या नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी सारा असे काही बोलून गेली की, त्याची बातमी झाली.

  नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत साराला तिच्या आईवडिलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुझ्या आईवडिलांच्या घटस्फोटाचे दु:ख आहे का? असा प्रश्न तिला केला गेला. यावर उत्तर देताना, त्यांचा घटस्फोट झाला हे माझ्यादृष्टीने बरे झाले, असे सारा म्हणाली.  खरे तर त्यांचा घटस्फोट झाला, यासाठी मी देवाचे आभार मानते. दोन लोक एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नसतील तर त्यांनी विभक्त व्हावे. त्यात काहीही गैर नाही. एकमेकांसोबत आनंदी नसूनही केवळ मुलांसाठी आयुष्यभर तडतोड करणे, याला काहीही अर्थ नाही, असे मी मानते. लोक अनेकदा एकमेकांसोबत आनंदी नसतात. पण मुलांसाठी ते एकत्र राहतात. हा विचारच मला करवत नाही, असेही ती म्हणाली.

  आई आणि वडिलांपैकी  तुझ्यावर कोणाचा जास्त प्रभाव आहे? असे विचारले असता ती म्हणाली की, माझे डॅडवर खूप प्रेम आहे. पण माझ्या आईचा माझ्यावर जास्त प्रभाव आहे. कारण मी आज जे काही आहे, ते तिच्यामुळे. तिने एकटीने आम्हाला वाढवले. माझी आई माझी ताकद आहे. ती माझी आई आहे, मैत्रिण आहे. ती माझे आयुष्य आहे.

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंगसैफ अली खान