Join us  

‘संजू’ लीक प्रकरणाने दुखावले राजकुमार हिरानी, लिहिली भावूक पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 12:38 PM

एखादा बिग बॅनरला चित्रपट इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आणि तिकडे आॅनलाईन लीक होतो. संबंधित चित्रपटाच्या मेकर्ससाठी ही धक्कादायक बाब असते. अलीकडे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासंदर्भातही हेच झाले.

चित्रपट लीक होणे, हे आता नवे राहिलेले नाही. गेल्या काही वर्षांत अनेक मोठे चित्रपट आॅनलाईन लीक झाले आहेत. एखादा बिग बॅनरला चित्रपट इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आणि तिकडे आॅनलाईन लीक होतो. संबंधित चित्रपटाच्या मेकर्ससाठी ही धक्कादायक बाब असते. कारण यामुळे चित्रपटाची कमाई प्रभावित होणार असते. अलीकडे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासंदर्भातही हेच झाले. त्यांचा ‘संजू’ ज्यादिवशी रिलीज झाला आणि अगदी त्याचदिवशी आॅनलाईन लीक झाला. गत शुक्रवारी चित्रपटगृहांत ‘संजू’चा फर्स्ट डे फस्ट शो सुरू असताना दुसरीकडे इंटरनेटवर ‘संजू लीक’चा हॅशटॅग ट्रेंड करू लागला होता. ‘संजू’च्या लिंक लोकांनी धडाधड शेअर केल्यात. ट्विटरवरून सुरु झालेला हा प्रकार काहीच क्षणात फेसबुकपर्यंत पोहोचला. अर्थात ‘संजू’च्या निर्मात्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता, सोशल मीडियावरून ‘संजू’ डाऊनलोड करणाऱ्या सगळ्या लिंक डिलिट केल्या. पण तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. कुठल्याही निर्माता - दिग्दर्शकाला याचे दु:ख होणे साहजिक आहे. राजकुमार हिरानीही याला अपवाद नाहीत. काल त्यांनी याच संदर्भात एक भावूक पोस्ट शेअर केलीे.

 ‘संजू कॅमेरा फोनने शूट करून पायरेट होत असल्याचे आम्हाला कळले आणि आम्हाला धक्काचं बसला. हजारो लोकांनी आमचा चित्रपट चित्रपटगृहांत जावून बघण्यास नकार दिला. काही लोकांनी याकडे आमचे लक्ष वेधले आणि आम्ही इंटरनेटवरच्या सगळया कॉपी डिलिट केल्या. मी सांगू इच्छितो की, आपण सगळे मनुष्यप्राणी आहोत. माणसांच्या घाम व रक्त आटवण्याचा अर्थ तुम्ही समजू शकाल, अशी मला आशा आहे. कारण एक चित्रपट घडवतात प्रचंड कष्ट पडतात. काही जणांनी पायरेटेड कॉपी न बघण्याचे आवाहन लोकांना केले, हे पाहून समाधान वाटले. सिनेमाप्रति तुम्हा लोकांचे हेच प्रेम आम्हाला सर्वोत्तम काम करण्यास प्रेरणा देते. संजूला लीक करणा-यांविरोधात आवाज उठवणा-यांचे मी आभार मानतो,’ असे त्यांनी लिहिले.

 

टॅग्स :संजू चित्रपट 2018राजकुमार हिरानीबॉलिवूडरणबीर कपूरफेसबुक